जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुस्लिम महिलेच्या पाठीवर कार्यकर्त्यानं चिकटवलं पक्षाचं पोस्टर, Video व्हायरल होताच समोर आलं सत्य

मुस्लिम महिलेच्या पाठीवर कार्यकर्त्यानं चिकटवलं पक्षाचं पोस्टर, Video व्हायरल होताच समोर आलं सत्य

मुस्लिम महिलेच्या पाठीवर कार्यकर्त्यानं चिकटवलं पक्षाचं पोस्टर, Video व्हायरल होताच समोर आलं सत्य

यासंदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे. भाजपचे यूपी प्रभारी अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी बुधवारी एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार करणारे काही कार्यकर्ते रस्त्यावरून चालणाऱ्या मुस्लिम महिलेच्या पाठीवर सपाचे स्टिकर चिकटवताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश, 10 फेब्रुवारी: रस्त्यावरून चालत असताना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (Samajwadi Party activists) महिलेच्या पाठीवर समाजवादी पक्षाचं स्टिकर चिकटवल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे. भाजपचे यूपी प्रभारी अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी बुधवारी एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार करणारे काही कार्यकर्ते रस्त्यावरून चालणाऱ्या मुस्लिम महिलेच्या पाठीवर सपाचे स्टिकर चिकटवताना दिसत आहेत. आज उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Assembly Election 2022) पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. दरम्यान, कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादाचा (Hijab Controversy) परिणाम यूपीमध्येही दिसून येत आहे. राजधानी लखनऊमध्ये (Lucknow Burqa Women Viral Video) बुरखा घातलेल्या महिलेच्या पाठीवर एका व्यक्तीनं समाजवादी पक्षाचे स्टिकर चिकटवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बुधवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता एका मुस्लिम महिलेच्या पाठीवर आपल्या पक्षाचं पोस्टर चिकटवताना दिसत आहे. यानंतर तो महिलेला चिडवतो. हा व्हिडिओ जुन्या लखनऊमधला असल्याचं बोललं जात आहे.

जाहिरात

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी हा व्हिडिओ शेअर करून अनुराग ठाकूर यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरून सपाला घेरलं. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिलं की, हा आहे लाल टोपीचा काळा कारनामा, पहा रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेसोबत सपा नेत्याचं गैरवर्तन. जिथे असे भरले आहेत, यूपीनं त्यांच्यासोबत का जावं. महिलेचं स्पष्टीकरण त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दिसणारा कार्यकर्ता आणि महिलेनं स्पष्टीकरण दिलं आहे. मोहम्मद जैनुद नावाचा कार्यकर्त्यानं म्हटलं की, आम्ही बहिणी आणि भाऊ आहोत आणि समाजवादी पक्षाचा प्रचार करत होतो.

त्याचवेळी व्हिडिओमध्ये दिसणारी बुरखा घातलेली महिला शब्बो म्हणाली की, जैनुद माझा लहान भाऊ आहे. आम्ही एकत्र समाजवादी पक्षाचा प्रचार करत होतो आणि एकमेकांची खिल्ली उडवत होतो. या घटनेदरम्यान मला कोणतीही इजा झाली नाही. भाजपचे लोक याला मोठा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात