न्यूयॉर्क, 16 एप्रिल: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर (social media) त्यांची एका व्हिडिओमुळे खिल्ली उडवली जात आहे. त्याचवेळी या व्हिडिओमुळे बायडेन यांच्या विरोधकांना त्यांच्यावर निशाणा साधण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. खरंतर, बायडेन गुरुवारी नॉर्थ कॅरोलिना (University of Pennsylvania in North Carolina) येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात भाषण देत होते आणि भाषण संपल्यानंतर ते एकटेच हवेत हात मिळवताना दिसले. ही संपूर्ण घटना व्हिडीओमध्ये कैद झाली असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
स्टेजवर कोणीही नव्हतं दुसरं
आपलं भाषण संपल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) वळले आणि त्यांनी हस्तांदोलन सुरू केलं, तर तेथे कोणीही नव्हतं. आपण स्टेजवर एकटे आहोत हे बायडेन यांनाही कळलं नाही. व्हिडिओमध्ये दिसून येतं की, बायडेन उजवीकडे वळले आणि देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो (God bless you all)असं म्हणत त्यांनी कोणाला तरी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला, तर तेथे कोणीही नव्हते. या चुकीनंतर बायडेन अचानक दुसरीकडे वळले.
After Biden finished his speech, he turned around and tried to shake hands with thin air and then wandered around looking confused pic.twitter.com/ZN00TLdUUo
— Washington Free Beacon (@FreeBeacon) April 14, 2022
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवली जात आहे. काही लोक असेही म्हणतात की बायडेन डिमेंशिया नावाच्या आजाराशी लढा देत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही त्यांच्या वयावर निशाणा साधत आहेत. बायडेन यांचे वाढते वय त्यांना सोडून जात आहे, त्यामुळे आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचाही विचार करायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे.
आधीही केलीय अशीच 'चूक'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीही अशी चूक केली आहे. काही काळापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते सरळ रस्ता सोडून घरात घुसले होते. मग असे बोलले जात होते की, चालताना बायडेन अचानक रस्ता विसरले असावेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, US President