नवी दिल्ली, 16 मार्च : उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती कायमच तिच्या फॅशनने लोकांना थक्क करत असते. आपण विचारही करु अशा गोष्टींपासून उर्फी कपड्यांची स्टाईल बनवते. उर्फीचे हटके, बोल्ड, स्टाईलीश, अतरंगी, कपडे कायमच लोकांचं लक्ष वेधत आलं आहे. या फॅशनमुळे उर्फी कायम प्रकाश झोतात असते. बऱ्याचदा उर्फी तिच्या फॅशनमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अशातच आता उर्फीचा मेल व्हर्जनही समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीच्या मेल व्हर्जन चर्चा रंगली आहे. सध्या चर्चेत आलेल्या तरुणाची अतरंगी आणि हटके स्टाईल पाहून अनेकांना उर्फीची आठवण आली आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर टिकटॉकर थरुन नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये या व्यक्तीचा फॅशन सेन्स पाहून असे म्हणता येईल की ही व्यक्ती उर्फी जावेदची जबरदस्त फॅन आहे. कारण ही व्यक्ती उर्फी जावेदसारखा विचित्र प्रकारचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने अवॉर्ड आणि टेपने बनवलेला ड्रेस घातलेला दिसत आहे.
आणखी एका व्हिडिओमध्ये हा व्यक्ती वर्तमानपत्रापासून बनवलेला ड्रेस परिधान करताना दिसत आहे. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर 6 लाख 58 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये व्यक्ती मिरचीपासून बनवलेला ड्रेस घातलेला दिसत आहे. ज्याला सोशल मीडियावर 12 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, आणखी एका आश्चर्यकारक व्हिडिओमध्ये व्यक्ती प्लास्टिकच्या फॉइलपासून बनवलेला ड्रेस परिधान करताना दिसत आहे. जे पाहून युजर्स थक्क झाले आहेत. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या ड्रेसिंग सेन्सचेही सर्वजण उर्फीचा मेल व्हर्जन असल्याचं म्हणत आहेत. तरुणाच्या व्हिडीओवर अनेक कमेंटदेखील येत आहेत.