जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हे तर अजबच! आधी प्रेग्नंट आणि नंतर लग्न हा नक्की काय प्रकार, या परंपरेविषयी माहितीये का?

हे तर अजबच! आधी प्रेग्नंट आणि नंतर लग्न हा नक्की काय प्रकार, या परंपरेविषयी माहितीये का?

व्हायरल

व्हायरल

जगभरात अनेक विचित्र परंपरा पहायला मिळतात. आपण विचारही करु शकत नाही अशा अनेक विचित्र परंपरा संपूर्ण जगभरात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : जगभरात अनेक विचित्र परंपरा पहायला मिळतात. आपण विचारही करु शकत नाही अशा अनेक विचित्र परंपरा संपूर्ण जगभरात आहे. जुन्या परंपरा मानत लोक अजूनही त्या प्रथांशी जोडले गेले आहेत. अशातच आणखी एक अनोख्या आणि विचित्र प्रथेविषयी माहिती समोर आलीये. तुम्हीदेखील या प्रथेविषयी ऐकून चकित व्हाल. अशीही एक परंपरा आहे जी आजच्‍या लिव्ह-इन रिलेशनशीपसारखीच आहे. फरक एवढाच की अशा नात्यातून अपत्य जन्माला येणे हे आजच्या सुसंस्कृत समाजात मान्य नसून या समाजात सर्रास चालते. आजही लिव्ह इन रिलेशनशिपबाबत समाजात वाद आहेत, मात्र गरसिया जमातीत ही परंपरा 1000 हजारापासून सुरू आहे. इथे आधी मुलगा आणि मुलगी एकत्र राहतात आणि मुलांना जन्म देतात, मगच लग्नाचा विचार करतात. ही जमात आफ्रिका किंवा अॅमेझॉनच्या जंगलात आढळत नाही, तर ती आपल्याच देशात गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात राहते. त्यांची विचारसरणी त्यांच्या काळाच्या खूप पुढे होती, म्हणूनच आज आपल्या मेट्रो शहरांमध्ये जे घडत आहे, ते त्यांनी शतकांपूर्वी केले होते. हेही वाचा - Bikini Farmer: महिला बिकिनी घालून करते शेती, सोशल मीडियावर ट्रोल होताच म्हणाली… मुलींना स्वतःसाठी मुलगा निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. यासाठी 2 दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात येते. इथे ती तिच्या आवडीचा मुलगा निवडते आणि त्याच्यासोबत पळून जाते. मग परत आल्यावर ते लग्न न करता एकत्र राहू लागतात. घरच्यांची याला काही हरकत नाही, पण मुलाच्या घरच्यांनी मुलीच्या घरच्यांना काही पैसेही द्यायचे असतात. या जोडप्यावर लग्नासाठी कोणतेही दडपण नसून ते या नात्यातून मुलेही जन्माला घालतात. अपत्य जन्माला येईपर्यंत ते लग्नाचा विचार करत नाहीत, पण मूल झाल्यानंतर लग्न करायचे की नाही हा त्यांचा निर्णय असतो.

News18लोकमत
News18लोकमत

या सामाजातील मुलींना एका मुलासोबत आयुष्य घालवण्यासाठी कोणतेही दडपण नसते. जर त्यांना एकत्र राहायचे नसेल तर मुलगी आपला दुसरा जोडीदार निवडू शकते. अनेकांची लग्नं त्यांची मुलं म्हातारी झाल्यावरच करतात आणि लग्नाशिवाय आयुष्यभर एकमेकांसोबत राहतात. असे मानले जाते की या समाजातील 4 भावांपैकी 3 भावांची लग्ने झाली, तर एक भाऊ अशा मुलीसोबत राहू लागला. यापैकी 3 भावांना अपत्य नव्हते मात्र चौथ्या भावाचे अपत्य झाले. तेव्हापासून गरसिया जमातीच्या लोकांनी ही परंपरा बनवली आहे. हे लोक त्याला ‘दाप प्रथा’ म्हणतात. या प्रथेनुसार, जेव्हा जेव्हा विवाह होतो तेव्हा त्याचा सर्व खर्च वराकडून केला जातो आणि विवाह देखील त्याच्या जागी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात