नवी दिल्ली, 1 डिसेंबर: एका महिन्यात हमखास कॅन्सर व्हावा, अशी इच्छा असेल तर माझ्याकडचा (Unique way of seller to sell gutka goes viral on social media) गुटखा जरूर विकत घ्या, असं ओरडणाऱ्या सेल्समनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. वास्तविक, ज्या व्यक्तीला आपला माल खपवायचा असतो, तो त्या वस्तूची (Usual way of selling things) जोरदार तारीफ करत असतो. अनेकदा तर त्या वस्तूचे नसलेले गुणदेखील सांगितले जातात. त्या वस्तूचं जास्तीत जास्त कौतुक करून आणि त्याचे चांगले गुण सांगून ग्राहकांच्या मनात वस्तूची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या व्हिडिओत दिसणारा गुटखा विक्रेता मात्र याच्या (Strange idea of marketing) बरोबर उलटी क्लुप्ती वापरत असल्याचं दिसून येत आहे.
#Gutkha marketing....💐💐👌 With warning 😢😢😊😢 & Targeted Customers☺️☺️😊😊😊@ajaydevgn @SrBachchan @ranvir01 pic.twitter.com/Wn5RW2A1Go
— Rupin Sharma IPS (@rupin1992) November 29, 2021
विक्रीचा अजब अंदाज
गुटखा विकताना हा विक्रेता त्यचे फायदे न सांगता तोटे सांगत आहे. गुटखा खाल्ल्यामुळे हमखास कॅन्सर होईल, असं सांगत हा गुटखा विकत आहे. ब्रेकअप झाल्यामुळे जर कुणी दुःखात असेल आणि स्वतःचं आयुष्य संपवण्याची इच्छा होत असेल, तर माझ्याकडचा गुटखा घ्या, असा आग्रह हा तरुण करतो. हा तरुण ज्या ज्या ठिकाणी गुटखा विकण्यासाठी जाईल, तिथे तो सर्वांचं लक्ष वेधून घेतो आणि गुटखा विकण्याची त्याची स्टाईल पाहून सर्वांनाच हसू फुटतं.
ट्रेनमध्ये विकतो गुटखा
ज्यांचं स्वतःच्या आयुष्यावर प्रेम नाही आणि ज्यांना मृत्यूचं भयंकर आकर्षण आहे, त्यांनी तातडीनं आपला गुटखा विकत घेऊन खावा, असं म्हणत मार्केटिंगची अनोखी स्टाईल असणाऱ्या या तरुणाकडं ट्रेनमधील सगळेजण लक्ष देऊन पाहत राहतात. त्याच्या घोषणा ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकतो.
हे वाचा- योग प्रशिक्षकांनो, 'या' जिल्हा परिषद NHM मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी
दुर्गुण सांगून मार्केटिंग
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मार्केटिंग विथ वॉर्निंग असं नाव या व्हिडिओला दिलं आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याला युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sale, Viral video.