2 जुलैला इंटरनॅशनल बिर्याणी डे असतो. बिर्याणी अनेकांची आवडती आहे. मात्र भारतीयांमध्ये बिर्याणीविषयी एक वेगळीच क्रेझ पहायला मिळते.
या खास प्रसंगी, ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्मने माहिती दिली आहे की भारतीयांनी गेल्या 12 महिन्यांत 7.6 कोटींहून अधिक बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत.
जानेवारी 2023 ते 15 जून 2023 पर्यंत दिलेल्या ऑर्डरच्या स्विगीच्या विश्लेषणानुसार, 2022 पेक्षा गेल्या साडेपाच महिन्यांत बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये 8.26 टक्के वाढ झाली आहे.
स्विगीने आपल्या अहवालात हे देखील नमूद केले आहे की कोणत्या शहरांमध्ये बिर्याणीची सर्वाधिक रेस्टॉरंट्स आहेत. या यादीत बंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे जिथे बिर्याणीची देणारी 24,000 रेस्टॉरंट आहेत.
यानंतर मुंबईचा नंबर येतो. येथे बिर्याणी देणाऱ्या रेस्टॉरंटची संख्या 22,000 पेक्षा जास्त आहे. या यादीत दिल्लीचा नंबर तिसऱ्या क्रमांकावर येतो.