लंडन, 08 नोव्हेंबर : अनेकांना आपल्या शरीराबात जाणून घेण्याची इच्छा असते. पण काही जणांची ही इच्छा इतकी तीव्र होते की ते जोशात भलतंच करून बसतात. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने आपल्या
प्रायव्हेट पार्ट
सोबत नको ते खेळ केला. त्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली. त्याचा वैद्यकीय रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. यूकेतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे. एका 15 वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत होतं. जेव्हा तो लघवी करायचा तेव्हा त्याला खूप वेदना व्हायच्या. त्याच्या आईने त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केल्या. त्याचा एक्स-रे रिपोर्ट काढला तेव्हा त्यात जे दिसलं ते पाहून तेसुद्धा शॉक झाले. कारण त्या मुलाचं गुप्तांग आणि पोटात चक्क एक यूएसबी केबल होती. या केबलला गाठी पडल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं, USB वायरचे दोन डिस्टल पोर्ट बाहेरी भागाच्या मांसातून बाहेर आले होते आणि गाठीचा भाग आतल्या बाजूने होता. तारेच्या दोन्ही बाजू मूत्रमार्गातून यशस्वीरित्या बाहेर काढलं पण गाठीचा भाग निघणं कठी णहोतं. यासाठी पेनिस आणि गुदद्द्वाराच्या मधील भाग कापावा लागला. हे वाचा -
प्रेग्न्सीचं एकही लक्षण नाही; वजन कमी होऊन पोटात तीव्र वेदना झाल्या आणि महिलेने अचानक दिला बाळाला जन्म हा मुलगा हेल्दी आणि फिट होता. त्याला कोणताही मानसिक आजारही नव्हता. डॉक्टरांनी त्याला ही यूएसबी त्याच्या शरीरात कशी गेली याबाबत विचारलं तेव्हा त्याने यामागील जे कारण सांगितलं ते धक्कादायक आहे. प्रायव्हेट पार्टचा आकार मोजण्यासाठी तो ही केबल पेनिसमधून आत घालत होता. त्याचवेळी ही केबल आतच अडकली. त्याने ती खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. कारण आत केबलला गाठी पडल्या होत्या. जेव्हा तो केबल खेचण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याच्या शरीराच्या आत रक्तस्राव होत होता आणि हे रक्त मूत्रमार्गातून बाहेर येत होतं.
(फोटो सौजन्य - ScienceDirect)
डॉक्टरांनी लगेच त्याचं ऑपरेशन केलं आणि केबल त्याच्या शरीरातून बाहेर काढली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार जर या मुलाचं तात्काळ ऑपरेशन केलं नसतं, तर त्याचा जीव गेला असता, असं डॉक्टर म्हणाले. हे वाचा - धक्कादायक! सोफ्याने घेतला 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; नेमकं काय घडलं पाहा काही दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सायन्स डायरेक्ट रिपोर्टनुसार नोव्हेंबर 2021 मधील ही घटना आहे. यूरोलॉजी केस हिस्ट्रीमध्ये या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली आहे.