जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! उडत्या विमानाच्या छतावर उभी राहिली 93 वर्षांची आजी, हजारो फूट उंचावर खतरनाक स्टंट; Watch Video

OMG! उडत्या विमानाच्या छतावर उभी राहिली 93 वर्षांची आजी, हजारो फूट उंचावर खतरनाक स्टंट; Watch Video

OMG! उडत्या विमानाच्या छतावर उभी राहिली 93 वर्षांची आजी, हजारो फूट उंचावर खतरनाक स्टंट; Watch Video

विमानाच्या आत बसण्याऐवजी आजी विमानाच्या छतावर उभ्या राहिल्या. त्यांचं कतरब पाहून तोंडात बोटं घालाल.

  • -MIN READ Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

लंडन, 10 ऑगस्ट : आकाशात उंच उडावं असं कुणाला वाटत नाही. यासाठी विमान, पॅराशूट, हॉट एअर बलून असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी काही जणांना साध्या विमानातही बसण्याचीही भीती वाटतं. असं असताना एका आजीबाई मात्र उडत्या विमानाच्या छतावरच उभ्या राहिल्या आणि आकाशात उंच उडण्याचा त्यांनी आनंद घेतला. खतरो की खिलाडी बनलेल्या या आजीबाईंना पाहून तरुणही हादरले आहेत. यूकेतील 93 वर्षांच्या बेट्टी ब्रोमेज ज्यांनी उडत्या विमानाच्या छतावर चढून सर्वांना धक्का दिला आहे.  या वयात अनेकांना स्वतःचा तोलही सांभाळता येत नाही. काठीशिवाय चालताही येत नाही अशा वयात या आजींनी खतरनाक स्टंट केला. त्या खतरों की खिलाडी बनल्या. बीबीसीच्या BBC Gloucestershire या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा -  ना पॅराशूट ना हॉट एअर बलून; पक्ष्यासारखे पंख पसरून उडू लागला माणूस; पाहा अद्भुत VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती विमानाच्या आत बसली आहे. विमानाच्या या पायलटचं नाव ब्रायन कॉर्न्स आहे. तर बेट्टी विमानाच्या छतावर उभ्या आहेत. त्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. पायलट ब्रायन म्हणाले, मी की वयोवृद्ध ब्रोमेज कोण सर्वात जास्त घाबरलेलं होतं मला माहिती नाही. ब्रोमेज या अद्भुत महिला आहेत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल बेट्टी यांनी हा असा स्टंट पाचव्यांदा केला आहे. याआधीही त्यांनी हायफ्लाइंग चॅलेंजमध्ये 4 वेळा असं विंग वॉकर केलं आहे. हे वाचा -  बंदुकीत टूथब्रश टाकून दात घासायला गेला, ट्रिगर दाबताच…; नको तो जुगाड करताना काय घडलं Watch Video वय हा फक्त आकडा असतो हे या आजींनी दाखवलं आहे. त्यांची जिद्द आणि हिंमतीला दाद दिली जाते आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या या डेअरिंगसाठी त्यांना सॅल्युटही केलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात