मुंबई, 09 ऑगस्ट : मला पंख असते तर…, मी पक्षी असतो तर…, मला उडता आलं असतं तर… असे काल्पनिक निबंध आपण शाळेत असताना लिहिलेच आहेत किंवा आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहून आपल्याला असं कधी ना कधी वाटलंच असेल. पण आपल्या डोक्यातील हीच कल्पना प्रत्यक्षात किंवा सत्यात उतरली तर… असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक व्यक्ती चक्क पक्ष्यांसारखे पंख पसरून उडताना दिसली. आकाशात उडण्याचे स्वप्न तसं माणसाने प्रत्यक्षात कधीच साकार केलं आहे. विमान, पॅराशूट, हॉट एअर balloon च्या मदतीने आकाशात उडता येतं. पण तरी या कोणत्याच गोष्टीचा वापर न करता पक्ष्यासारख पंख पसरून उडता आलं तर… असाच प्रयत्न करणारी ही व्यक्ती. हे वाचा - VIDEO - खाताच बेडकांना बसला ‘440 व्होल्टचा झटका’; कोण आहे हा किडा तुम्ही सांगू शकता का? व्हिडीओ मध्ये पाहू शकता ही व्यक्ती आकाशात उडते आहे. तिच्याजवळ ना एअर balloon आहे, ना पॅराशूट. तरी ही व्यक्ती ढगांमध्ये उडते आहे.
; या व्यक्तीने एक खास ड्रेस घातला आहे. ज्याला पंख आहेत. व्यक्तीच शरीर पूर्णपणे या कपड्यांच्या आत आहे. त्यामुळे दुरून पाहता आकाशात एखादा पक्षीच उडावा असं दिसतं. हे वाचा - बाबो! व्यक्तीच्या अंगात येतो महिषासुर, मग खातो लाकडाचा भुस्सा अन् चारा; पाहा Video @nftbadger ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. व्हिडीओ स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही त्यावर विश्वास बसत नाही.