जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अजबच! 102 मुलं, 12 बायका, 568 नातवंडं असलेला व्यक्ती आता म्हणतो....

अजबच! 102 मुलं, 12 बायका, 568 नातवंडं असलेला व्यक्ती आता म्हणतो....

व्हायरल

व्हायरल

अनेक शहरांत लोकसंख्येत वाढ पहायला मिळते. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता अनेकजण याविषयी जागरुकता निर्माण करताना दिसून येतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : अनेक शहरांत लोकसंख्येत वाढ पहायला मिळते. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता अनेकजण याविषयी जागरुकता निर्माण करताना दिसून येतात. मात्र याउलट अशीही अनेक शहरे आहेत ज्याठिकाणी लोकसंख्या कमी आहे. तेथे लोकसंख्या वाढवण्यावर जोर दिला जातो. त्यामुळे तेथील लोक जास्त आपत्य जन्माला घालताना दिसून येतात. मात्र असाही एक व्यक्ती आहे ज्याचे चक्क 102 मुले, 12 बायका आणि 568 नातवंडे आहेत. हे ऐकून तुम्हीही हैराण झाला असाल मात्र ही गोष्टी खरी आहे. नक्की हा व्यक्ती कोण आहे याविषयी जाणून घेऊया. युगांडाच्या एका व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 102 मुले, 12 बायका आणि 568 नातवंडे असलेल्या या शेतकऱ्याने आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मुसा हसह्या कसारा नावाच्या या व्यक्तीला इतकी मुले आहेत की त्यांना त्यांची नावेही आठवत नाहीत. पूर्व युगांडातील दुर्गम ग्रामीण भाग असलेल्या बुटालेजा जिल्ह्यातील बुगिसा गावात राहणार्‍या शेतकर्‍याने एएफपीला सांगितले की प्रथम या गोष्टीला मजेत घेतले परंतु आता हीच एक समस्या बनत आहे. हेही वाचा -  मद्यप्रेमींना ‘या’ देशांमध्ये राहण्यास नक्कीच आवडेल, कारणही आहे तेवढंच खास एएफपीच्या वृत्तानुसार, मुसा हसह्या कसारा म्हणाला, ‘माझी प्रकृती सतत खालावत चालली आहे. एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी फक्त दोन एकर जमीन फारच कमी आहे. माझ्या दोन बायका मला सोडून गेल्या कारण मी अन्न, शिक्षण, कपडे या मूलभूत गोष्टी देऊ शकत नाही. हसाह्या सध्या बेरोजगार आहे, पण त्याच्या गावात पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

68 वर्षीय मुसाने सांगितलं की, कुटुंब खूप मोठे आहे. ते चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे. अन्नासाठीही पैसे उभे करणे कठीण झाले आहे. आता मुसाने आपल्या सर्व पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. माझे उत्पन्न कमी होत आहे आणि माझे कुटुंब मोठे होत आहे. मुसाने सांगितले की, त्याने 1972 मध्ये आपल्या पहिल्या पत्नीशी एका पारंपारिक सोहळ्यात लग्न केले होते. जेव्हा दोघेही जवळपास 17 वर्षांचे होते. त्यांच्या लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांचे पहिले मूल, सँड्रा नबवीर, जन्माला आले. मग माझा कौटुंबिक वारसा पुढे नेण्यासाठी माझ्या भावाने, नातेवाईकांनी आणि मित्रांनी मला अनेक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. यासाठी अनेक स्त्रियांशी विवाह केला. मुसाची अनेक मुलं त्याच्यासोबत शेतात काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचा धाकटा मुलगा 6 वर्षांचा आणि मोठा मुलगा 51 वर्षांचा आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुसासाठी आता काम करणे कठीण होत आहे. मुसा जिथे राहतो तिथे एकापेक्षा जास्त विवाह करणे कायदेशीररित्या चुकीचे नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात