जाहिरात
मराठी बातम्या / Viral / वारंवार जुळी होत असल्याने संतप्त झाला नवरा; पाचव्यांदाही ट्विन्स होताच रागात बायको, मुलांना...

वारंवार जुळी होत असल्याने संतप्त झाला नवरा; पाचव्यांदाही ट्विन्स होताच रागात बायको, मुलांना...

वारंवार जुळी होत असल्याने संतप्त झाला नवरा; पाचव्यांदाही ट्विन्स होताच रागात बायको, मुलांना...

पत्नी फक्त जुळ्या मुलांना जन्म देते हे नॉर्मल नाही, असं नवऱ्याला वाटलं म्हणून त्याने धक्कादायक निर्णय घेतला.

  • -MIN READ Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

कम्पाला, 20 जुलै : मुलगी नको मुलगाच हवा असा अट्टहास काही जणांचा असतो. मुलगाच हवा म्हणून किती तरी लोक कोणत्याही थराला जातात. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात मुलगी होत असल्याने नव्हे तर जुळी होत असल्याने नवरा संतप्त झाला. बायकोला वारंवार जुळी होत असल्याने नवरा त्रस्त झाला होता. पाचव्यांदाही ट्विन्स झाल्याने त्याने धक्कादायक पाऊल उचललं. आई-बाप होणं हा कोणत्याही दाम्पत्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असतो. त्यात जर जुळी जन्माला येणार असतील असं समजलं तर त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही.  युगांडात राहणारी नलोंगो ग्लोरियाने नुकताच जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. हे तिचं पाचवं जुळं होतं. तिने याआधी चार वेळा जुळ्यांना जन्म दिला आहे. हे वाचा -  स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी पोटच्या गोळ्यालाही सोडलं नाही; 5 दिवसांच्या बाळासोबतच आईचं धक्कादायक कृ्त्य पाचव्या डिलीव्हरीनंतर ती घरी जाण्याच्या तयारीत होती. घरी आपल्या स्वागताची तयारी होत असेल, याची उत्सुकता तिला होती. पण घडलं उलटंच. घरी तिचं स्वागत करण्याऐवजी तिचा नवरा स्सालोंगो तिला  घराबाहेरचा रस्ता दाखवला. जुळी मुलं होत असल्याने त्याने तिला मुलांसोबत घराबाहेर काढलं. नलोंगोने स्थानिक टीव्ही चॅनेल NTV Mwasuze Mutya वर आपलं दुःख व्यक्त केलं. जेव्हा ती पुन्हा ट्विन्ससह प्रेग्नंट होती तेव्हा तिच्या नवऱ्याचं वागणं बदललं होतं. तो तिला सतत माहेरी जाण्यास सांगत होता. पण आता डिलीव्हरीनंतर त्याने तिला सोडून दिलं. महिलेच्या पतीच्या मते, त्याची पत्नी फक्त जुळ्या मुलांना जन्म देते हे नॉर्मल नाही. जसं त्याला पाचव्या जुळ्यांबाबत समजलं तसं त्याने आपली पत्नी आणि मुलं सर्वांसोबत नातं तोडलं. हे वाचा -  नवऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तरुणींनी एकमेकींशी केलं लग्न; अजब लग्नाची नेमकी काय कहाणी वाचा नलोंगो दहा मुलांसह आता रस्त्यावर आली आहे. आपल्याला आई-वडिलांबाबत काहीच माहिती नाही. लहानपणीच काम करण्यासाठी आपल्याला विकलं होतं. आता आपल्याजवळ आपलं म्हणण्यासारखं कुणीच नाही. आपल्या मुलांचा आपल्याला काहीच त्रास नाही. त्यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे सोडणार नाही. सर्व दुःख सहन करून त्यांचा सांभाळ करेन. पण आता आपल्याकडे कमाईचा कोणताच मार्ग नाही, असं ती म्हणाली. आता मुलांसोबत ती रस्त्यावर राहत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात