टोकियो, 16 डिसेंबर: जगाच्या इतिहासात पहिल्यांदा (First time in the history) जमिनीवरून (Earth) अंतरिक्षात (Space) फूड डिलिव्हरी (Food delivery) करण्यात आल्याच्या विक्रमी घटनेची नोंद झाली आहे. शहरातल्या शहरात हॉटेलमधून घरी खाद्यपदार्थ आणून देण्याऱ्या सेवा सध्या तमाम शहरांत उपलब्ध आहेत. ऑर्डर केल्यानंतर काही मिनिटांत आपल्याला हवं असणारं अन्न घरपोच दिलं जातं. मात्र जे शास्त्रज्ञ अंतरिक्षात असणाऱ्या स्पेस स्टेशनमध्ये काम करत आहेत, त्यांना फूड ऑर्डर करायचं असेल, तर काय? अर्थात, हे सर्व शास्त्रज्ञ तिथं आपलं अन्न स्वतः शिजवून खातात. मात्र या शास्त्रज्ञांना फूड डिलिव्हरी देण्याचा यशस्वी प्रयत्न नुकताच करण्यात आला.
Uber Eats のデリバリーは、進化し続けています。
— Uber Eats Japan(ウーバーイーツ) (@UberEats_JP) December 14, 2021
今、配達していない場所へ、次々と。@yousuck2020 さん、配達ありがとうございます🚀#宇宙へデリバリー #UberEats pic.twitter.com/Sh0PsXXwMX
महाग डिलिव्हरी पृथ्वीवरून अंतरिक्षात फूड डिलिव्हरी द्यायची, म्हणजे खर्च तर होणारच. अंतराळात करण्यात आलेली ही फूड डिलिव्हरी ही आतापर्यंतची सर्वात महाग फूड डिलिव्हरी असल्याचं मानलं जात आहे. जपानी कोट्यधीश युसाकू मेजावा यांनी ही कमाल करून दाखवली आहे. आता साक्षात स्वतः कोट्यधीश असणारी व्यक्ती जर खाद्यपदार्थ घेऊन डिलिव्हरी करायला जात असेल, तर ती महाग असणारच. उबर इट्सचे उपक्रम उबर इट्सकडून ही डिलिव्हरी करण्यासाठी उद्योगपती युसाकू मेजावा यांनी पूर्ण तयारी केली होती. 11 डिसेंबर या दिवशी तब्बल 9 तासांचा प्रवास करून त्यांनी हे अंतर पार केलं आणि स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथं असणाऱ्या वैज्ञानिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. आपल्यासोबत आणलेलं फूड पॅकेट त्यांनी शास्त्रज्ञांच्या दिशेनं फेकलं. स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ते पॅकेट तरंगत तरगंत शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचलं. शास्त्रज्ञांनी मानले आभार हे वाचा- PHOTO: एकाच वेळी 30 कोटी अंडी देणारी महाकाय SUNFISH काय होतं पाकिटात? या पाकिटात गोड्या चटणीपासून तयार केलेलं मांस होतं. शास्त्रज्ञांना पचण्यासाठी सोपं जावं आणि त्यांची तब्येत ठिक राहावं, या दृष्टीनं हे अन्न तयार करण्यात आलं होतं. उबर ईट्सकडून या घटनेचा व्हिडिओ तयार करण्यात आला असून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.