Home /News /viral /

नवरीच्या घरात सुरू होती लग्नाची धावपळ; दारात दोन नवरदेवांच्या वराती पाहून वऱ्हाडीही झाले शॉक!

नवरीच्या घरात सुरू होती लग्नाची धावपळ; दारात दोन नवरदेवांच्या वराती पाहून वऱ्हाडीही झाले शॉक!

कोरोनामध्ये लग्नासंदर्भात अनेक विचित्र घटना समोर आल्या आहे, मात्र हा प्रसंग पाहून सर्वजण हैराण झाले.

    कन्नोज, 16 मे :  उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात लग्न समारंभादरम्यान एक विचित्र समस्या उभी राहिली होती. नवरी एक आणि दोन नवरदेव. ठरल्या प्रमाणे एक नवरदेव नवरीला घेण्यासाठी वरात घेऊन आला होता, तेव्हाच दुसरा हा नवरीचा प्रियकर होता. तो मात्र नवरीच्या सांगण्यानुसार वरात घेऊन तिच्या घरी हजर झाला होता. घराच्या बाहेर दोन नवरदेव आणि दोन वऱ्हाडी पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर पहिल्या नवरदेवाने पोलिसांना बोलावलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांना त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीच ऐकलं नाही. शेवटी दोन्ही पक्षाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. यानंतर हे प्रकरण सोडविण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तिर्वा पोलीस ठाणे हद्दीतील ककलापूर गावातील निवासीच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. गुरुवारी रात्री सौरिक येथील फुलनपूर गावातून वरात आली होती. त्यानंतर लग्नाचे विधी सुरू करण्यासाठी नवरीला बोलावल्यात आलं. तेव्हा मात्र तिने लग्नास नकार दिला. त्यावेळी नवरीने आपल्या प्रियकरासोबत फोनवर बातचीत केली. तिचा प्रियकर काही वेळाने मित्रांना घेऊन वरात घेऊन पोहोचला. हे ही वाचा-बाबो! गाडी पडली 25 कोटीला, नंबर प्लेटसाठी 52 कोटींचा खर्च; VIDEO पाहून व्हाल शॉक प्रियकर आल्यानंतर नवरीने त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र रात्रीच तिच्या प्रियकराच्या हातावर मेंदी लावण्यात आली, आणि लग्नाचे विधीही सुरू झाले. या प्रकरणावर चिडलेल्या पहिल्या नवरदेवाने पोलिसांना झालेल्या प्रकाराबाबत सांगितलं. पोलीस आले व त्यांनी दोन्ही नवरदेव व एकमेव नवरीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. बराच वेळ सुरू असलेल्या चर्चेअंती नवरीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावण्याचं निश्चित करण्यात आलं. पहिला नवरदेव देखील रिकाम्या हाताने घरी परतला नाही. तर त्याच गावातील एका कुटुंबीयांनी आपल्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं. या अदलाबदलीनंतर मात्र नवरीसाठी आणलेल्या वस्तू नवरदेवाने परत घेतल्या. त्याशिवाय नवरीकडून दिली जाणारी बाइकदेखील त्याने परत केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या