मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाबो! गाडी पडली 25 कोटीला आणि नंबर प्लेटसाठी 52 कोटी केला खर्च; VIDEO पाहून व्हाल शॉक!

बाबो! गाडी पडली 25 कोटीला आणि नंबर प्लेटसाठी 52 कोटी केला खर्च; VIDEO पाहून व्हाल शॉक!

मोबाइल नंबर असो वा गाडीचा नंबर, प्रत्येकाला आपला नंबर हटकेच हवा असतो.

मोबाइल नंबर असो वा गाडीचा नंबर, प्रत्येकाला आपला नंबर हटकेच हवा असतो.

मोबाइल नंबर असो वा गाडीचा नंबर, प्रत्येकाला आपला नंबर हटकेच हवा असतो.

  • Published by:  Meenal Gangurde

मग तो मोबाइल नंबर असो वा गाडीचा नंबर, प्रत्येकाला आपला नंबर हटकेच हवा असतो. असे हटके, फॅन्सी नंबर नेहमीच आकर्षित करीत असतात. मात्र तुम्ही कधी असं काही ऐकलं आहे का, कोणी गाडीचा नंबर घेण्यासाठी तब्बल 52 कोटी रुपये खर्च केले. तुम्हाला ही बाब विचित्र वाटत असली तरी हे खरं आहे. एका ग्राहकाने आपल्या  Bugatti Chiron कारसाठी तब्बल 52 कोटी रुपये खर्च करून नंबर घेतला आहे.

Bugatti Chiron च्या किंमतीबद्दल सांगायचं झालं तर ती एक महागडी कार आहे. या सुपर कारची किंमत 25 कोटी रुपये आहे आणि कस्टमाइजेशननुसार याची किंमत अधिक वाढू शकते. मात्र या कारसाठी ज्या नंबर प्लेटची खरेदी करण्यात आली आहे, ती या कारच्या किंमतीच्या दुप्पट आहे. YouTube वर Mo Vlogs नावाच्या एका चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कारबद्दल आणि नंबर प्लेटबाबत माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या कारचा रजिस्ट्रेशन नंबरची किंमत 7,000,000 डॉलर आहे, जी तब्बल 52 कोटी रुपये आहे. पाहायचं झालं तर ही किंमत Bugatti Chiron पेक्षा दुप्पट आहे. या नंबर प्लेटवर केवळ ‘9’ लिहिलं आहे, जी अत्यंत वेगळी बाब आहे.

हे ही वाचा-कोरोना काळात बाहेर जाण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन रिन्यू करा Driving License

नंबर प्लेट का आहे इतकी महाग?

Mo vlog च्या व्हिडिओमध्ये नंबर प्लेटची इतकी जास्त किंमत होण्याबाबत सांगितलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, रजिस्ट्रेशन प्लेटची किंमत यावर लावलेल्या नंबरच्या साइजवर अवलंबून असते. आपण अनेकदा पाहतो की, Bugatti Chiron मध्ये केवळ सिंगल डिजिटची नंबर प्लेट आहे. यासाठी याची किंमत इतकी जास्त आहे. जर तुम्ही जास्त नंबरची प्लेट घेतली तर याची किंमत कमी होईल. या नंबर प्लेटची किंमत वेळेबरोबरच वाढत असते. असे अनेक लोक आहेत, जे या नंबर प्लेटमध्ये गुंतवणूक करतात, आणि ती विकून नफा कमावतात. यासाठी स्पेशन ऑक्शनचं आयोजनही केलं जातं.

" isDesktop="true" id="551403" >

Bugatti Chiron च्या काही खास गोष्टी

Bugatti Chiron च्या खासियतबद्दल सांगायचं झालं तर व्हिडिओमध्ये दिल्यानुसार कार Chiron Sport आहे. याला 2018 मध्ये जेनेवा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये सादर करण्यात आलं होतं. Chiron Sport कार Chiron हा स्पोर्ट वर्जन आहे. ही स्टँडर्ड Chiron पेक्षा 18 किलोग्रामने हलकी आहे. यासोबतच  रियर एक्सेलवर टॉर्क-वेक्टरिंग डिफ्रेंशियल देण्यात आले आहे, जे कॉर्नर्सला सहजपणे कर्व आउट करतात.

First published:

Tags: Car, Viral video.