अॅमेझॉनच्या ( Big discounts on Amazon) ई-कॉमर्स वेबसाइटवर सध्या एका जाहिरातीची मोठी चर्चा सुरू आहे. या कंपनीने तब्बल 1 लाख रुपयांचा तोशिबा एअर कंडीशनगर अवघ्या 5900 रुपयात विक्रीस काढला. जेव्हा ग्राहकांनी मोठ्या संख्येने एसीचं बुकिंग केलं. त्यानंतर कंपनीला जाग आली. आपण काय गोंधळ घातला याची जाणीव झाली. जोपर्यंत कंपनीला आपल्या चुकीची जाणीव झाली, तोपर्यंत अनेक ग्राहकांनी हे प्रॉडक्ट खरेदी केलं होतं. सोमवारी (5 जुलै) हा प्रकार घडला. आजच दिली होती जाहीरात, 278 रुपयांच्या EMI वर विक्री अॅमेझॉनवर सोमवारी हा एसी लिस्टमध्ये होता. तोशिबाचा हा एसी 1.8 टन 5 स्टार इन्वर्टरसह ग्राहकांना ऑफर (Toshiba’s AC 1.8 ton 5 star inverter offers to customers) केला जात होता. याची मूळ किंमत 96,700 रुपये आहे. मात्र त्याऐवजी 94 टक्के सूटसह केवळ 5900 रुपयांत विकण्यासाठी ठेवण्यात आला होता. अॅमेझॉन लिस्टिंगमध्ये एअर कंडिशनरच्या मूळ किंमतीवर 90,800 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात होता. या ऑफरमध्ये 278 रुपयांच्या महिन्याचा EMI दाखविला जात होता. इतक्या स्वस्तात एसी मिळत असल्याचे पाहून अनेक ग्राहकांनी हा खरेदी केला. ( worth rs 1 lakh AC for just Rs 6000 EMI of Rs 278 only ) हे ही वाचा- पुरुषांप्रमाणे आली दाढी आणि आपल्याच रुपाच्या प्रेमात पडली महिला कारण… चूक दुरुस्त करून 59,490 रुपयांत केला लिस्ट अॅमेझॉनने (Amazon) आता तोच तोशिबा 1.8 टन 5 स्टार इन्वर्टर, 59,490 रुपयांत एक ग्लास व्हाइट व्हेरिएटसह 2800 रुपयांच्या EMI सह मूळ किमतीत 20 टक्क्यांची सवलत देऊन विक्रीस ठेवला आहे**.** सोबतच तोशिबा एसीचा कम्प्रेसर, पीसीबी, सेन्सर, मोटर्स आणि इलेक्ट्रिकल पार्ट्सवर 9 वर्षांच्या अतिरिक्त वॉरेन्टीसह 1 वर्षाच्या व्यापक वॉरेंटीदेखील दिलं जात आहे. हा फिल्टरला ड्राय ठेवण्यासाठी स्वत:च स्वच्छ होतो. यामुळे यातून दुर्गंधी किंवा मॉल्ड फॉर्मेशनसारख्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे या एसीसाठी मॅन्टेनन्सचा खर्च कमी होतो 2019 मध्येही घातला होता असाच गोंधळ प्राइम डे 2019 मध्येही अॅमेझॉनने 9 लाख रुपयांचा कॅमेरा गियर 6500 रुपयांमध्ये विकला होता. खरेदीदारांना या जाहिरातीबद्दल कळताच मोठ्या संख्येने कॅमेऱ्याचं बुकिंग झालं. अॅमेझॉनने 15-16 जुलै 2019 मध्ये जगभरात प्राइम डेज सेल केलं होतं. अमेरिकेत या सेलदरम्यान एक बग आला होता. ज्यामुळे कॅनन EF 800 लेन्स 99 टक्क्यांच्या सवलतीसह अवघ्या 6,500 रुपयांमध्ये विकला जात होता. मात्र याची मूळ किंत 9 लाख रुपये आहे.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.