जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नदीत अडकला वाळू नेणारा ट्रक, पुढे काय झालं पाहा VIDEO

नदीत अडकला वाळू नेणारा ट्रक, पुढे काय झालं पाहा VIDEO

नदीत अडकला वाळू नेणारा ट्रक, पुढे काय झालं पाहा VIDEO

हिमाचल प्रदेशमध्ये 2 सप्टेंबरबर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हमीनपूर, 27 ऑगस्ट : उत्तर भारतात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. हिमाचल प्रदेशातील हमीनपूर इथे बुधवारी वाळूनं भरलेला ट्रक वेगानं येणाऱ्या पाण्यात वाहून गेला आहे. या ट्रकमधील चालकाचा जीव मोठ्या मुश्किलीनं वाचवण्यात यश आलं आहे. चालकानं हुशारीनं उडी मारून आपला जीव वाचवला आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार वाळू आणि रेती वाहून नेणारा टिप्पर पाण्यात वाहून गेला आहे. टिपर चालक ब्रह्मदास निवासी तालने सांगितले की तो टिप्परमध्ये वाळू घेऊन जात होता. अचानक मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाण्याच्या मध्यभागी ट्रक अडकला. 5 ते 6 फूट पाणी भरल्यानं सांगितलं.

हे वाचा- …आणि बघता बघता 1 किमी लांब वाहून गेला तरूण! पाहा थरारक LIVE VIDEO हा ट्रक पाण्यात बुडायला लागल्याचं पाहून चालकानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तीन तास उलटून गेल्यानंतर त्याला बाहेर पडण्यात यश आलं. मोठ्या मुश्किलीनं टिप्परमधून बाहेर पडल्याचं चालकानं सांगितलं. हिमाचल प्रदेशमध्ये 2 सप्टेंबरबर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात