नवी दिल्ली 08 मे : अलीकडे लॉटरीबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू होती, तेव्हा केस स्टडीचं उदाहरण देताच लोकांना आश्चर्य वाटलं. या प्रकरणात एका महिला ड्रायव्हरने आठ कोटी रुपये जिंकले होते. लॉटरी जिंकणाऱ्या या महिलेची कहाणी अशी आहे की, महिलेच्या गाडीचं तेल संपलं आणि इंधन भरण्यासाठी थांबताच तिने लॉटरीची तिकिटं खरेदी करण्यास सुरुवात केली. यावेळी तिचा पार्टनरही तिथे उपस्थित होता. पेट्रोल पंपावर जाण्याचा कोणताही प्लॅन नसताना ते अचानक तिथे गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण काहीसं जुनं आहे, जे नुकतंच चर्चेत आलं आहे. ही महिला ट्रक ड्रायव्हर एका झटक्यात करोडपती झाली आणि पेट्रोल पंपावर इंधन टाकत असताना हा सर्व प्रकार घडला. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी लॉरा कीन काही महिन्यांपूर्वी खरेदीसाठी ट्रक घेऊन बाहेर पडली होती आणि यावेळी तिचा जोडीदारही तिच्यासोबत होता. त्याचं असं झालं की, तिला इंधन भरताना कळलं की त्यासोबत लॉटरीची तिकिटेही विकली जात आहेत.
तिने तिकीट घेतलं. काही मिनिटांनंतर ट्रकमध्ये ऑइल टाकताच लॉरा तिच्या जोडीदारासोबत पुढ गेली. इतक्यात तिचं नशीब चमकलं. तिला सांगण्यात आलं की तिच्या लॉटरीच्या तिकिटाने जॅकपॉट जिंकला आणि ती करोडपती झाली. वृत्तानुसार, ती तिच्या ट्रकमध्ये इंधन भरण्यासाठी नॉर्थ कॅरोलिनामधील कर्नर्सविले येथील सेव्हन इलेव्हन गॅस स्टेशनवर थांबली होती. लॉराला तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. तिची कहाणी व्हायरल होताच लोकांनी त्या पेट्रोल पंपाचा शोध सुरू केला. नंतर कळालं की तिथे लकी ड्रॉचे तिकीट विकले जात होते आणि ते त्या महिला ट्रक चालकाने घेतलं होतं.