केपटाऊन, 13 जानेवारी : अगदी पारंपारिक नृत्यांपासून ते पाश्चिमात्य नृत्यांपर्यंत डान्सचे बरेच प्रकार आहेत. सोशल मीडियावर तसे डान्सचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या सोशल मीडियावर अशा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याला जगातील सर्वात कठीण डान्स म्हटलं जातं आहे. सोशल मीडियावर या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. असं या डान्समध्ये नक्की काय आहे ते पाहा.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक खास वेशभूषा करून मास्क घातलेली व्यक्ती दिसते आहे. ही व्यक्ती नाचते आहे. तिचे पाय जमिनीवर थिरकताना दिसत आहेत. पण ती व्यक्ती जमिनीवर आपटून इतक्या वेगाने पाय उचलतो की वेग पाहून आपल्यालाही थोडं गरगरल्यासारखं होतं. जणू काही या व्यक्तीच्या पायाला स्प्रिंग लावली आहे का? असंच वाटतं.
माहितीनुसार हा झौली डान्स आहे. पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरही कोस्टमधील हा नृत्य प्रकार आहे. आफ्रिकेतील एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान शूट करण्यात आला आहे.
@TheFigen_ ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये हा जगातील सर्वात कठीण डान्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही युझर्सही याच्याशी सहमत आहेत. यापेक्षा कठीण डान्स आपण पाहिला नसल्याचं एका युझरने म्हटलं आहे. काही नेटिझन्सनी या व्यक्तीच्या एनर्जीला दाद दिली आहे.
हे वाचा - घागरा घालून तरुणीचा सायकलवर भन्नाट डान्स, धाडस पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा Video
तुम्हालाही नाचायला आवडत असेल, तुम्हीही एखाद्या डान्सचं प्रशिक्षण घेतलं असेल तर आता हा डान्सही तुम्ही करून पाहा. तुम्हाला काय वाटतं, हा डान्स खरंच कठीण डान्स आहे का? तुम्हाला हा डान्स करायला जमतो आहे का? हा डान्स करताना नेमक्या काय वाटतं, काय अडचणी येतात? हे आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
This is "Zaouli" dance of Central Ivory Coast and is labelled as the most impossible dance in the world! pic.twitter.com/1F3SSzhF3O
— Figen (@TheFigen_) January 12, 2023
हा डान्स तुम्हाला जमला, नाही जमला तरी तुमच्या ओळखीतील लोकांसोबत ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांना हा डान्स करून दाखवण्याचं चॅलेंज द्यायलाही तुम्हाला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Dancer, Viral, Viral videos