जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : तुम्ही कचऱ्यात फेकता 'त्या' वस्तूचा बनवला ड्रेस आणि Miss Universe च्या रॅम्पवर अवतरली सौंदर्यवती

VIDEO : तुम्ही कचऱ्यात फेकता 'त्या' वस्तूचा बनवला ड्रेस आणि Miss Universe च्या रॅम्पवर अवतरली सौंदर्यवती

मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झालेल्या सौंदर्यवतीच्या ड्रेसची चर्चा.

मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झालेल्या सौंदर्यवतीच्या ड्रेसची चर्चा.

सौंदर्यवतीने चक्क कचऱ्याचा ड्रेस घालून मिस युनिव्हर्सच्या रॅम्पवर रॅम्प वॉक केला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 13 जानेवारी : मिस युनिव्हर्स म्हटलं की डोळ्यांसमोर सुंदर असा ड्रेस घालून कॅटवॉक करत चालणाऱ्या सौंदर्यवती येतात. या सौंदर्यवतींच्या ड्रेसवरून आपली नजर हटत नाही. अशाच ड्रेसवरून मिस यूनिवर्स 2023 चर्चेत आलं आहे. आता तुम्ही पाहिलेली फोटोतील ही सौंदर्यवती. जी मिस युनिव्हर्सची स्पर्धक आहे. तिने घातलेला ड्रेस तुम्ही पाहिला तर तो इतका चमकतो आहे, एकटक त्या ड्रेसकडे पाहणंही अशक्य होतं आहे. हिच्या ड्रेसवर हिरेच-हिरे जडले आहेत असं वाटतं आहे. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या ड्रेसमध्ये कचराही आहे. हो बरोबर वाचलंत… सौंदर्यवती चक्क कचऱ्याचा ड्रेस घालून मिस युनिव्हर्सच्या रॅम्पवर उतरली. रेशम, सोनं किंवा चांदीच्या तारांनी सजवलेले साड्या, ड्रेस तुम्ही पाहिले असतील. पण मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झालेली सौंदर्यवती कचऱ्याचा ड्रेस घालून रॅम्पवर चालली. त्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ही सौंदर्यवती आहे मिस थायलंड  एना सुएंगम. आता कचऱ्यापासून बनलेला ड्रेस म्हणजे हा ड्रेस पाहून तुम्हाला काय वाटतं? हा ड्रेस नेमका कसला असावा तुम्ही गेस करू शकता का? अजूनही तुमचा विश्वास बसत नाही, तर आता आम्हीच सांगतो हा ड्रेस नेमका आहे कसला. तर हा ड्रेस कॅनच्या पूल टॅबपासून बनवण्यात आला आहे.जे आपण सर्वच जण कचऱ्यात फेकून देतो. पण त्यापासून असा सुंदर ड्रेस बनवण्यात तयार करण्यात आला की त्यावरून कुणाचीच नजर हटत नाही आहे. या ड्रेसमध्ये स्वारोव्सकी डायमंड्सही लावण्यात आले, ज्यामुले हा ड्रेस अधिकच आकर्षक झाला. हे वाचा -  घागरा घालून तरुणीचा सायकलवर भन्नाट डान्स, धाडस पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा Video कचऱ्याचा असा ड्रेस पाहिल्यानंतर काही लोकांनी मिस थायलंडला कचरा ब्युटी क्वीन असंही म्हटलं आहे. तुम्हाला हा ड्रेस पाहिल्यानंतर काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

जाहिरात

मिस यूनिवर्स 2023 अमेरिकेच्या लुइसियानाच्या न्यू ऑरलियन्समध्ये होणार आहे. 71 व्या मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झालेल्या 86 सौंदर्यवतींमध्ये दिविता राय भारताचं प्रतिनिधीत्व करते आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात