मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हॉस्पिटलनं दोन दिवसांच्या उपचारासाठी रुग्णाकडून आकारले 52 लाख रुपये, नंतर झुगाड करत स्वतः बनवले एक्स-रे मशीन

हॉस्पिटलनं दोन दिवसांच्या उपचारासाठी रुग्णाकडून आकारले 52 लाख रुपये, नंतर झुगाड करत स्वतः बनवले एक्स-रे मशीन

दोन दिवसांच्या उपचारांनंतर जेव्हा त्याला रुग्णालयाने (Hospital) बिल पाठवलं, तर त्या बिलातील रक्कम पाहून त्या तरुणाला धक्का बसला.

दोन दिवसांच्या उपचारांनंतर जेव्हा त्याला रुग्णालयाने (Hospital) बिल पाठवलं, तर त्या बिलातील रक्कम पाहून त्या तरुणाला धक्का बसला.

दोन दिवसांच्या उपचारांनंतर जेव्हा त्याला रुग्णालयाने (Hospital) बिल पाठवलं, तर त्या बिलातील रक्कम पाहून त्या तरुणाला धक्का बसला.

न्यूयॉर्क, 29 मार्च: सध्याच्या काळात नवनवीन आजार येत असल्याने आरोग्य सेवा खूप महाग झाल्या आहेत. अगदी सामान्य आजारांवरील उपचाराचा खर्चही लाखो रुपयांमध्ये जातो. अशीच एक घटना अलीकडे समोर आली आहे. एक तरुण आजारी पडल्यानं त्याला दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांच्या उपचारांनंतर जेव्हा त्याला रुग्णालयाने (Hospital) बिल पाठवलं, तर त्या बिलातील रक्कम पाहून त्या तरुणाला धक्का बसला. त्यानंतर या तरुणाने स्वतःच अगदी स्वस्तातलं एक्स-रे मशीन (X-ray machine) तयार केलंय. उस्मान नावाच्या तरुणाने या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने त्या बिलाचा फोटो आणि त्याने तयार केलेलं एक्स-रे मशीन दाखवलं आहे.

हे प्रकरण अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये (California) घडलंय. उस्मान नावाच्या एका तरुणाने युट्यूबवर व्हिडिओ शेअर केला आहे. तो इंजिनीअर आहे. एके दिवशी हा तरुण आजारी पडला आणि त्याला दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसांनी जेव्हा त्याला रुग्णालयाकडून उपचारांचं बिल देण्यात आलं, तेव्हा ते पाहून उस्मानला धक्का बसला. बिलाची रक्कम तब्बल 69 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 52 लाख रुपये होती.

Russia-Ukraine युद्धाचा भारत करणार End Game..! दिल्लीत निघणार Solution

बेसिक अँटिबायोटिक्स आणि एक्स-रेसाठी (Basic antibiotics and X-ray) त्याला हे बिल भरावं लागलं. या धक्कादायक घटनेनंतर इंजिनीअर उस्मानने बिलाची किंमती पाहून एक्स-रे मशीन तयार केलं. त्याने मशिनची किंमत दीड लाख रुपये ठेवली, जी त्याला हॉस्पिटलमध्ये द्याव्या लागणाऱ्या किंमतीच्या तुलनेत खूपच कमी होती. सुदैवाने, उसमानच्या इन्शुरन्समधून (health insurance) बहुतेक बिल कव्हर झालं. तरीही, त्याला जवळचे 2,500 डॉलर भरावे लागले होते.

उस्मानने यूट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला ज्यामध्ये सुरुवातीला त्याने हॉस्पिटलचं बिल दाखवलं आहे. त्यानंतर तो काही उपकरणं एकत्र करताना दिसतोय. त्याने 400 डॉलरची वीज, 155 डॉलरची एक्स-रे व्हॅक्यूम ट्यूब, काही गिझर काउंटर आणि शीट मेटलच्या रोलपासून एक्स-रे मशीन तयार केलं. हे मशीन उत्तम चालत आहे. त्याने केवळ प्रात्यक्षिकासाठी एक्स-रे मशीन तयार केलं आणि नंतर ते मोडून टाकलं, असंही उस्मानने सांगितलं.

दरम्यान, उस्मानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याला सध्या YouTube वर 4.7 मिलियन व्ह्युज आहेत. रुग्णालयाच्या एका बिलमुळे या तरुणाने अगदी स्वस्तातलं एक्स-रे मशीन तयार केलं. त्यासाठी त्याला फार वस्तूदेखील लागल्या नाहीत. परंतु उस्मानने हे मशीन मोडून का टाकलं, या संदर्भातलं कोणतंही कारण त्याने सांगितलेलं नाही.

First published:

Tags: America, Viral news