नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर अनेक मेसेज, व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असतात. त्यापैकी अनेक मेसेज आपण खरे आहेत की खोटे याची सत्यता न पडताळताच फॉर्वर्ड करतो. काहीवेळा खोट्या मेसेज किंवा अफवांमुळे त्याचे दुष्परिणाम किंवा संभ्रम निर्णम होण्याचा धोका असतो. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 15 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं नाही असं सांगणारा एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. या मेसेजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्षात आलं की हा मेसेज खोटा आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी)नेही हा व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. अंतर कितीही असो हेल्मट घालणं सक्तीचं आहे त्यामुळे अशा खोट्या मेसेजपासून सावध राहाणं आणि सत्यता पडताळणं गरजेचं आहे.
हे वाचा- सासरच्या मंडळीचा प्लॉटवर डोळा, पतीने घोटला पत्नीचा गळा! काय आहे व्हायरल मेसेज? ‘असा दावा केला जात आहे की सागर कुमार जैन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला आहे. सागरकुमार जैन यांच्या याचिकेचा हवाला देत व्हॉट्सअॅपवर मेसेज व्हायरल होत आहे. महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रांच्या 15 किमीच्या आत लोकांना हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार नाही. व्हायरल मेसेजमध्ये असेही लिहिले आहे की जर कोणतेही वाहतूक पोलिस किंवा पोलिस हेल्मेट न घालण्याविषयी विचारत असतील तर मी नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या हद्दीत आहे असे उत्तर द्या, कारण आता शहराच्या 15 कि.मी.च्या परिघात हेल्मेट घालणे बंधनकारक नाही.’ गेल्या काही दिवसांमध्ये वाहतूक आणि हेल्मेट संदर्भातील नियम हे नागरिकांच्या दृष्टीनं कठोर कऱण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या काळात असे फेक मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.