जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral : स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचाऱ्याने कबुतराला वाचवलं, होतोय कौतुकाचा वर्षाव

Viral : स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस कर्मचाऱ्याने कबुतराला वाचवलं, होतोय कौतुकाचा वर्षाव

व्हायरल

व्हायरल

आजकालच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये पशु-पक्षी ते माणसांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 जानेवारी : आजकालच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये पशु-पक्षी ते माणसांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो. कधी कोण कुठे अडचणींत सापडेल काही सांगता येत नाही. मात्र अशा अडचणींच्या परिस्थितीत अनेक लोक देवदूत बनून मदतीचा हात पुढे करतात. असाच काहीसा प्रकार समोर आला असून एका ट्रॅफिक पोलिसाने आपल्या जीवाची पर्वा न करता एका पक्षाचा जीव वाचवला आहे. त्यामुळे या पोलिसावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. बंगळुरुच्या एका ट्रॅफिक पोलिसाने सध्या सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याच्यावर कौतुकाची थाप पडण्यामागचं विशेष कारण म्हणजे त्या ट्रॅफिक पोलिसाने एका कबुतराचा जीव वाचवला. ट्रॅफिक पोलीस कबुतराला वाचवण्यासाठी कोणत्याही सेफ्टीशिवाय बऱ्याच फूट उंच असलेल्या लोखंडी होर्डिंगवर चढला. त्याने अतिशय सावधगिरीने उंच होर्डिंगवर चढत कबुतराचा जीव वाचवला. पायात दोरा गुंतल्यामुळे कबुतर त्या उंच होर्डिंगवर अडकलं होतं. त्याच्या पायात अडकलेला दोरा काढत पोलिसाने त्या कबुतराचा जीव वाचवला. हेही वाचा -  मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून आणि वरुन का असतात open? यामागे आहेत ‘ही’ कारणे पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडस आणि तळमळीसोबतच त्याच्या माणुसकीनेही लोकांची मने जिंकली. सोशल मीडियावर या पोलीसाचं तोंडभरुन कौतुक होत असून त्याच्यावर कौतुकाची थाप टाकत आहेत. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, यापूर्वीही असे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामधून माणूसकीचं दर्शन घडेल. अशा लोकांमुळे अजूनही माणूसकी जीवंत असल्याचं दर्शन होतं. यामुळे अनेकांना यापासून एक चांगला संदेश पोहोचतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात