नवी दिल्ली, 20 एप्रिल : प्रत्येकाला आपण सुंदर, छान दिसावं असं वाटत असतं. विशेष करुन मुलींना तर आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं असं वाटत असतं. यासाठी त्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात. निरनिराळे ब्यूटी प्रोडक्ट, थेरपी, सर्जरी करतात. मात्र कधी कधी या गोष्टी अंगलटही आलेल्या पहायला मिळाल्या आहेत. सध्या अशीच एक घटना समोर आलीये. एका मॉडेलने सर्जरी केली आणि नंतर तिची भयानक अवस्था झाली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका मॉडेलने सर्जरी करण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय निवडला आणि नंतर तिची भयान अवस्था झाली. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
थायलंडची 26 वर्षीय मॉडेल माली कांजनाफुपिंग इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि 1.5 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. अलीकडेच, तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिने आपल्या चेहऱ्याची स्थिती सर्वांना सांगितली आहे. प्रत्येकजण तिला पाहून हैराण आहे कारण तिचा सुंदर चेहरा पूर्णपणे खराब दिसत आहे. मॉडेलच्या झालेल्या अवस्थेबाबात द सन वेबसाइटने वृत्त दिलं आहे.
मालीला तिचे गाल मोठे वाटत होते. जेव्हाजेव्हा ती हसायची तिचे गाल वर यायचे आणि तिला स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरचा वाटायची. त्यामुळे तिनं गालाची सर्जरी करुन गाल पातळ करायचं ठरवलं. यापूर्वी तिने ज्या क्लिनिकमध्ये पहिल्या सर्जरी केल्या होत्या त्याच क्लिनिकमध्ये ती गेली. मालीने तिचे पहिलेही सर्जरी केल्यामुळे तिला तिथे चांगली सूट मिळाली. फिलर इंजेक्शनसाठी क्लिनिकमध्ये 8,000 रुपये आकारले जात होते, परंतु माळीकडून केवळ 6,000 रुपये घेतले. स्वस्तात पाहून चटकन तिने फिलर इंजेक्शन घेतलं. मात्र इंजेक्शनच्या काही काळानंतर तिला कसंतरी होऊ लागलं. हेही वाचा - Strong Woman : सशक्त स्त्रीमध्ये असतात या 6 गोष्टी; तुम्ही स्वतःला किती नंबर द्याल मालीच्या चेहऱ्यावर जळजळ सुरू झाली आणि चेहरा लाल झाला. तिना वाटले की हे किरकोळ दुष्परिणाम आहेत आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही ठीक होईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिचा चेहरा पाहून तिला धक्काच बसला. चेहऱ्यावर खोलवर पुरळ उठले होते आणि पू बाहेर येत होते. यासोबतच फोडही आले. एक-दोन दिवस तिने चेहऱ्याची अवस्था तशीच ठेवली कारण तिला वाटले की कदाचित स्वतःहून बरी होईल, पण तिसऱ्या दिवशी जेव्हा चेहऱ्याची स्थिती बिघडू लागली तेव्हा ती दुसऱ्या त्वचारोग तज्ज्ञाकडे गेली. माळी यांच्या गालावर इंजेक्शन दिलेले फिलर निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या बंद झाल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगतिले. दरम्यान, कमी पैशात सर्जरी करण्याच्या चक्करमध्ये यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आपल्या शरीरासोबत काहीही करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.