मुंबई, 20मे- 111 वर्षांपूर्वी बुडालेल्या टायटॅनिक जहाजाच्या पहिल्या फूल साईझ डिजिटल स्कॅनमध्ये त्याच्या काही महत्त्वाच्या डिटेल्सचं दस्तवेजीकरण करण्यात आलंय, असं जहाजाबद्दल नवीन डॉक्युमेंट्री बनवणाऱ्या कंपन्यांनी गुरुवारी सांगितलं. खोल समुद्रातील रिसर्चर्सच्या एका टीमने
टायटॅनिक
चं डिजिटल स्कॅन पूर्ण केलंय. यासाठी त्यांनी मागच्या उन्हाळ्यात उत्तर अटलांटिकमध्ये सहा आठवडे घालवले आणि जहाजाचे अवशेष तसेच आजूबाजूच्या डेब्रिसचं मॅपिंग केलं. या संदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय. संशोधकांनी डेब्रिस व सभोवतालच्या तीन मैलांच्या परिसरात स्कॅन करण्यासाठी दोन सबमर्सिबलचा वापर केला. यात जहाजावरील प्रवाशांचे शूज आणि घड्याळंही सापडली. हा डेटा 15,000 फोटोंचा असल्याचा अंदाज आहे. हा या पूर्वी प्रयत्न केलेल्या पाण्याखालील 3D मॉडेलपेक्षा 10 पट मोठा आहे, असा दावा डीप सी एक्सप्लोरेशन फर्म मॅगेलनचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड पार्किन्सन यांनी केला.डॉक्युमेंट्री मेकर अटलांटिक प्रॉडक्शनचे प्रमुख अँथनी गेफेन म्हणाले, फोटोंची क्वालिटी पूर्वीच्या तुलनेत खूप चांगली आहे. आता फोटोंमध्ये रिअलिस्टिक 3D मॉडेलमध्ये बो आणि स्टर्न दोन्ही सेक्शन चांगले कॅप्चर केले आहेत. (हे वाचा:
Shocking! इथं अचानक गायब होतायेत चालत्या गाड्या; रहस्यमयी पुलाचा चक्रावून टाकणारा VIDEO
) “प्रोपेलरवर सीरिअल नंबरसह सर्व डिटेल्स आहेत. ही वन-टू-वन डिजिटल कॉपी आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये आत्तापर्यंत आपल्याला माहीत असलेल्या या ऐतिहासिक जहाजाच्या बहुतेक पैलूंचा समावेश केला आहे. या नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने रिसर्चर्सना टायटॅनिकबद्दल डिटेल माहिती मिळेल व इतिहासाचा नव्याने अर्थ लावण्यास मदत करेल,” असं गेफेन म्हणाले. संशोधकांनी सात महिन्यांत मिळवलेल्या डेटावर आधारित ही डॉक्युमेंट्री पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. टायटॅनिक 15 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून न्यूयॉर्क शहरापर्यंतच्या प्रवासावर असताना उत्तर अटलांटिकमधील न्यूफाउंडलँडच्या एका हिमनगाला धडकलं होतं. हे जहाज काही तासांतच बुडालं होतं आणि त्यात सुमारे 1,500 जणांचा मृत्यू झाला होता. 1985 मध्ये जहाजाचे अवशेष सापडले होते, ते कॅनडाच्या किनाऱ्यापासून सुमारे 435 मैल म्हणजेच 700 किलोमीटर दूर समुद्राखाली सुमारे 12,500 फूट खोल आहेत.
“जहाज कसं बुडालं याबद्दल आमची गृहितकं अंदाजावरून आली आहेत. कारण असं कोणतंही मॉडेल नाही की, आपण रिकन्स्ट्रक्ट किंवा अचूक अंतरावर वर्क करू शकतो. स्कॅनच्या या गुणवत्तेमुळे भविष्यात लोकांना टायटॅनिकचा अनुभव घेता येईल, त्यामुळे मी उत्साहित आहे,” असंही ते म्हणाले.“आमच्यापैकी कोणीही या पूर्वी कधीही न पाहिलेले डिटेल्स मला दिसत आहेत आणि यामुळे मला आजपर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवता येतो. आमच्याकडे अॅक्चुअल डेटा आहे, ज्याची मदत इंजिनीअर्सना जहाज बुडण्यामागील खरी तांत्रिक कारणं शोधण्यास होऊ शकते,” असं या प्रकल्पात सहभागी टायटॅनिकचे प्रमुख एक्सपर्ट पार्क्स स्टीफन्सन म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.