मुंबई, 03 एप्रिल : कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ चालू आहे. त्यामुळे संसर्ग टाऴण्याठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन वारंवार पंतप्रधान मोदी करताना दिसत आहेत. कोरोनाच्या भीतीनं आता महिलांनी घरातही आपल्या सदस्यांसोबत डिस्टन्स ठेवायला सुरुवात केल्याचे भन्नाट टिकटॉक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवरा-बायकोमध्ये दोन फूट लांब उभं राहून बोलण, जेवण वाढणं अशा छोट्या छोट्या गोष्टींचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक व्हिडीओ प्रसिद्ध बॉलिवूडची अभिनेत्री राखी सावंतने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात राखी सावंत घरी आहे आणि ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पत्नीने कोरोनाच्या भीतीनं तीन फुटावरून जेवण वाढलं आहे. पत्नीचं हे वागणं मागणं पाहून पत्नीनं डोक्याला हात मारला आहे. पत्नी सगळं जेवण लांब वाडग्यानं पतीला वाढतेय तिचा हा असा अवतार पाहून त्यानंही तिच्यासमोर हात टेकले.
या व्हिडीओला एक हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर 14 तासांत 22 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.'' मला खूप कंटाळा आल्यानं मी टिक टॉक वापरते आहे. तो चीन, अमेरिका किंवा लंडनचा आहे की नाही याची मला पर्वा नाही.'' असं कॅप्शन देत हा टिकटॉक व्हिडीओ राखी सावंतने शेअर केला आहे.