मुंबई, 26 जानेवारी : पाण्यात फार फार तर एखादा मोठा मासा नाही किंवा मगरीची भीती असते पण वाघ (tiger) कुणी कल्पनाही करणार नाही. पण नदीतून प्रवास करणाऱ्या अशाच प्रवाशांना समोर वाघ दिसला आणि त्यांच्या अंगाचं पाणी पाणी झालं. होडी मागे आणि वाघ पुढे असा हा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतो आहे.
वाघाला समोर पाहताच प्रत्येकाला घाम फुटतोच. नदीत होडीसमोर असाच एक वाघ आला आणि होडीतील प्रवाशांना धडकीच भरली. सुंदरवनमधील (Sundarbans) हा व्हिडीओ आहे. जिथं वाघ नदीत पोहोत नदी पार करताना (Tiger Crosses River) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. IFS अधिकारी रमेश पांडे (IFS Officer Ramesh Pandey) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Bagh...Bagh! 🐅
This sighting of a young tiger crossing the river was undoubtedly an unusual one. However, keeping silence and safe distance is a must. See the video till end. VC:WA pic.twitter.com/NxjWyZCpw5
व्हिडीओत पाहू शकता, काही लोक होडीतून प्रवास करत आहेत. एका नाविकाला समोर वाघ पोहोताना दिसतो आणि सुरुवातीला तो वाघ वाघ म्हणून ओरडतो. हळूहळू सर्वजण मोठमोठ्याने वाघ वाघ वाघ असं ओरडू लागतात. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
होडी हळूहळू वाघाच्या जवळ जाते. प्रवाशांच्या हृदयाची धाकधूक तशी वाढते. त्यांच्या बोलण्यातूनच ती भीती दिसून येते आहे. होडीतील प्रवासी ओरडत असल्यानं वाघाचं लक्षही त्यांच्याकडे जातं. वाघही आपला पोहोण्याचा वेग वाढवतो. तो भराभर पोहू लागतो आणि होडीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. वाघ एका दिशेला आणि होडी एका दिशेला जाते. पुढे वाघ हळूहळू नदीच्या किनाऱ्यावर पोहोचतो.