जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! डोक्यावर भलीमोठी बाईक घेऊन सरसर चढला बसवर; नेटिझन्स म्हणाले हाच खरा बाहुबली

OMG! डोक्यावर भलीमोठी बाईक घेऊन सरसर चढला बसवर; नेटिझन्स म्हणाले हाच खरा बाहुबली

OMG! डोक्यावर भलीमोठी बाईक घेऊन सरसर चढला बसवर; नेटिझन्स म्हणाले हाच खरा बाहुबली

फिल्ममध्ये तुम्ही असं पाहिलं असेल पण रिअल लाइफमध्ये कदाचित नाहीच.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जानेवारी :  हिरो भलीमोठी बाईक (bike) आपल्या हातात उचलतो. व्हिलनशी फायटिंग करताना ज्या वस्तू प्रत्यक्षात उचलणं शक्य नाही त्या अगदी एका हातातही सहज उचलतो. एरवी फिल्ममध्ये आपण असे बरेच सीन पाहत आलो आहोत. असे सर्वच सीन खरे असतात असं नाही. प्रत्यक्षात कुणाला असं काही उचलणं शक्य नाही. पण रिअल लाइफमध्ये एका व्यक्तीनं ते करून दाखवलं आहे. डोक्यावर भलीमोठी बाईक (Motorcycle) घेणाऱ्या रिअल बाहुबलीचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (socia व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भलीमोठी बाईक आपल्या डोक्यावर घेतली आहे. इतकंच नव्हे कर तर तो ती बाईक घेऊन बसवरही चढला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्काच बसला आहे.

जाहिरात

खरं तर हा व्हिडीओ पाहून आपला स्वतःच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही. तब्बल 140 किलोची ही बाईक असावी. तितकी मोठी बाईक त्यानं आपल्या डोक्यावर घेतली आहे. बरं त्याची शरीरयष्टीही फिल्ममधील हिरोप्रमाणे पिळदार नाही. सामान्यच शरीरयष्टीचा तो आहे. तरीदेखील त्यानं डोक्यावर बाईक घेऊन दाखवली. बाईक घेऊन तो थांबला नाही तर त्या बाईकसह तो बसच्या शिडीवर जढला आणि बसच्या टपापर्यंत त्यानं बाईक पोहोचवली. हे वाचा -  DJ डान्स करताना आजोबांवर बरसला आजीचा दांडा आणि… VIDEO पाहाल तर आवरणार नाही हसू असं करताना ना त्याचा हात किंवा ना त्याचा पाय थरथरतो आहे. अगदी एखादी साधी सायकल उचलावी तसं त्यानं त्या बाईकला उचलल्याचं दिसतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झालेत. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रत्येक जण या व्यक्तीचं कौतुक करत आहे. कुणी त्याला बाहुबली तर कुणी त्याला शक्तिमान म्हटलं आहे. तर एका युझरनं रिकामी उपाशी पोट असं सर्वकाही करून घेतो, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात