नवी दिल्ली 06 मे : सिंहाला जंगलाचा राजा असला तरी शिकारीच्या बाबतीत वाघाला कधीही कमी लेखू नये. दुर्बल आणि आजारी हत्तींची शिकार करण्यात वाघ अतिशय वेगवान मानला जातो. आता शिकार करण्याचा प्रयत्न करताना एखादा प्राणी व्हिडिओमध्ये दिसला, तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. असाच काहीसा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये एक मुलगा मोठ्या गवताळ प्रदेशात हत्तीवर स्वार होताना दिसत आहे. जेव्हा तो हत्तीवर स्वार होतो तेव्हा त्याच्या डाव्या हातात एक मोठी काठी असते, तर त्याच्या उजव्या हातात पिन बेंड मेटल रॉड असतो. इतक्यात एक वाघ शेतातून धावत येतो आणि थेट हत्तीच्या दिशेने उडी मारतो, असं व्हिडिओच्या शेवटच्या भागात दिसत आहे.
Wait for tiger .. 😲😱 pic.twitter.com/Pv5r1HiSVD
— Terrifying Nature (@TerrifyingNatur) May 1, 2023
हा व्हिडीओ खरंच भयानक आहे. वाघाने हत्तीच्या दिशेने उडी मारताच व्हिडिओ संपतो आणि पुढे काय होतं याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा व्हिडिओ पाहूनच कोणाचाही थरकाप उडेल. वाघाने उडी घेतल्यानंतर हा व्यक्ती वाघावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतानाही दिसतो. मात्र, यात शेवटी काय झालं, हे व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं नाही. हा भयानक व्हिडिओ टेरिफायिंग नेचर @TerrifyingNatur नावाच्या अकाऊंटवरुन ट्विटरवर कॅप्शनसह शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “वाघाची वाट पाहा…”. एका अभ्यासानुसार, वाघ 13 ते 15 फूट उंचीपर्यंत उडी मारू शकतो. तर हत्तीची उंची 13 फूटापर्यंत असू शकते.