बीजिंग, 01 नोव्हेंबर : खेकडा म्हटल्यानंतर कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण आवडतो म्हणून तुम्ही खेकडा जिवंत तर खाणार नाहीत ना? आणि विचार करा ज्या खेकड्याला जिवंत पकडतानाही त्याच्या नांगीत तो आपल्याला पकडण्याची भीती असते, असा खेकडा जिवंत खाल्ला तर काय होईल, कल्पनाच नको वाटते. शिवाय शिजवलेला खेकडा खातानाही तो जपूनच खावा लागतो. त्याचा एखादा भाग जरी घशात अडकला तरी महागात पडू शकतं. पण अशाच खेकड्याला एका व्यक्तीने जिवंत खाल्लं आहे. चीनमधील ही घटना आहे. तसं चीनमध्ये विचित्र पदार्थ, जिवंत प्राणी खाणं हे तुमच्यासाठी नवीन नाही. पण या व्यक्तीने आवड म्हणून नव्हे तर सुडाच्या भावनेतून जिवंत खेकडा खाल्ला आहे. त्याच्या मुलीला खेकडा चावला. त्यानंतर या व्यक्तीने त्याच खेकड्याला जिवंत कचाकचा चावून खाल्लं. पण त्याचा हा बदला त्याला चांगलाच महागात पडला. त्याचा सूड त्याच्यावरच भारी पडला. जिवंत खेकडा खाल्ल्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली. तो गंभीररित्या आजारी झाला. हे वाचा - सकाळी टीन, संध्याकाळी बाटली; बिअरप्रेमी माकडामुळे शॉप मालक हैराण, Video पाहाच! साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार 39 वर्षांच्या लू नावाच्या व्यक्तीने एक छोटा खेकडा जिवंत खाल्ला. दोन महिन्यांनंतर त्यांच्या पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. लूच्या मेडिकल रिपोर्टनुसार, त्याची छाती, पोट, यकृत आणि पचन प्रणालीत बदल दिसून आला. पण याचंं नेमकं कारण डॉक्टरांनाही समजेना. रुग्णालयातील पचन तंत्र विभागातील डॉ. काओ किआन यांनी सांगितलं, आम्ही त्याला त्याने कधी काही विचित्र खाल्लं का, याबाबत वारंवार विचारत होतो. कारण असं काहीही खाल्ल्याने अॅलर्जी होऊ शकते. पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. अखेर त्याच्या पत्नीने जे काही घडलं ते सांगितलं. ते पाण्यातून जात होते तेव्हा त्याच्या मुलीला एक छोटा खेकडा चावला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने जिवंत खेकडा चावला. शेवटी लूनेही याची कबुली दिली. हे वाचा - ‘ही’ महिला थडग्यापाशी जाऊन मिळवते रेसिपीज आणि बनवते मृतांच्या आवडीचे पदार्थ रक्त तपासणीनुसार लूला कमीत कमी तीन संसर्ग झाल्याचं निदान झालं. कच्चे मांस खाल्ल्याने हे संक्रमण होतं. सुदैवाने या व्यक्तीला तसं काही झालं नाही. पण त्याच्या डॉक्टरांनी जिवंत खेकडा खाण्यापासून सावध केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.