जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बंदिस्त वाघाशी मस्तीही जीवावर बेतली, पिंजऱ्यातील वाघाने असा घेतला जीव; भयानक VIDEO

बंदिस्त वाघाशी मस्तीही जीवावर बेतली, पिंजऱ्यातील वाघाने असा घेतला जीव; भयानक VIDEO

वाघाचा व्यक्तीवर भयानक हल्ला.

वाघाचा व्यक्तीवर भयानक हल्ला.

पिंजऱ्यातील वाघाने पिंजऱ्याबाहेरील व्यक्तीवर खतरनाक हल्ला केला आहे. ज्याचा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 04 नोव्हेंबर : जंगल सफारी किंवा नॅशनल पार्कमध्ये आपण गेलो आणि अचानक वाघ आपल्यासमोर आला तर हल्ल्याच्या भीतीने त्याच्यासमोर जाण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. पण तोच वाघ प्राणी संग्रहालयात असेल. तर तो पिंजऱ्यात बंदिस्त म्हणून आपल्याला काहीच करणार नाही, या विश्वासाने काही लोक छाती ताणून बिनधास्त त्याच्यासमोर जातात. इतकंच नव्हे तर त्याच्यासोबत मस्तीही करतात. पण बाहेर असो वा पिंजऱ्याच्या आत वाघ तो वाघच… पिंजऱ्यातील वाघही किती खतरनाक ठरू शकतो, याचाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने बंदिस्त म्हणून पिंजऱ्यातील वाघासोबत मस्ती केली. पण हीच मस्ती त्याच्या जीवावर बेतली. पिंजऱ्यात राहूनही या वाघाने त्याचा जीव घेतला आहे. वाघाने व्यक्तीवर केलेल्या या हल्ल्याचं भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. जो आता तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, हृदयाची धडधड वाढेल. हे वाचा -  अंधारात अचानक समोर आला बिबट्या, भीतीने नागरिकांनी त्याच्यावर टॉर्च मारताच…; VIDEO VIRAL व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक वाघ पिंजऱ्यात दिसतो आहे. पिंजऱ्याबाहेरील व्यक्ती त्याला आपल्याकडे बोलावते. हाताने इशारे करून ती बोलावते. तसा वाघ त्याच्या जवळ येतो. वाघाच्या डोक्यावरून हात फिरवतो. त्यानंतर त्याच्या मानेवर हात ठेवतो. सुरुवातीला वाघ शांत असतो. पण वाघ तो वाघ. शेवटी आपलं खतरनाक रूप दाखवतोच. जशी व्यक्ती त्या वाघाच्या मानेवर आपला हात मारते, तसा वाघ चवताळतो आणि त्या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात धरतो. व्हिडीओत व्यक्तीचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. पण तरी वाघ त्याला सोडत नाही. या व्यक्तीचं शेवटी काय झालं माहिती नाही. पण व्हिडीओच्या शेवटी पिंजऱ्याजवळ रक्त पडल्याचं दिसतं. हे वाचा -  दिवसाढवळ्या वर्दळीच्या रस्त्यावर आला वाघ; तरुणीला जबड्यात धरून फरफटत नेलं; भयानक LIVE VIDEO माहितीनुसार ही घटना मेक्सिकोतल्या एका प्राणीसंग्रहायलातील आहे. ज्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला ती व्यक्ती या प्राणीसंग्रहायलातीलच कर्मचारी आहे. ती वाघाला खायला देत होती. त्यावेळी त्याने आपला हात पिंजऱ्याच्या आत टाकला आणि भयंकर घडलं. ज्याचा विचारही त्याने केला नव्हता. वाघाच्या हल्ल्यात बरंच रक्त गेल्याने या घटनेनंतर या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.

Crazy Uploads युट्यूब चॅनेलवरील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे. हा व्हिडीओ जुना आहे, जो आता सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात