कॅनबेरा, 09 जुलै : तुम्ही कुठे फिरायला गेला असाल आणि तिथं माकडं असतील तर या माकडांनी पर्यटकांच्या वस्तू पळवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण आता तर चक्क एका ऑक्टोपसने असं केलं आहे. एका ऑक्टोपसने एक कॅमेरा पळवला. हा कॅमेरा घेऊन तो खोल समुद्राच्या आत गेला. त्यानंतर कॅमेऱ्यात जे दृश्य कैद झालं ते थक्क करणारं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधील ही घटना आहे. एक 15 वर्षांची मुलगी स्नोर्किंग करत होती. तेव्हा एका ऑक्टोपसने तिचा गोप्रो कमेरा पळवला. जेसी लॉफेल असं या मुलीचं नाव आहे. तिने या आठ हातांच्या चोराची अनोखी कहाणी सांगितली आहे. जेसीने 52 वर्षीय अंडरवॉटर फोटोग्राफर मारी क्लाऊटशी संपर्क साधला. जो बोडेरी नॅशनल पार्कच्या रीफमध्ये स्नॉर्केल करत होता, तिने ऑक्टोपसने आपला कॅमेरा नेल्याचं त्याला सांगितलं आणि त्याच्याकडे मदत मागितली. कासवाने सापावर केला जबर हल्ला; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही अखेर ते सर्वजण पाण्याच्या आत गेले. जिथं त्यांनी त्यांचा शेवटचा कॅमेरा पाहिला होता. सुदैवाने ऑक्टोपस तिथं होता. तो कॅमेराही त्याच्याकडेच होता. त्याने आपल्या हातही हातांमध्ये तो कॅमेरा घट्ट जखडून ठेवला होता. कॅमेराला मिठी मारून तो बसला होता.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात, कॅमेरा घेतलेला हा ऑक्टोपस दिसतो आहे. क्लाऊटने काठीच्या मदतीने ऑक्टोपसच्या विळख्यातील कॅमेरा वेगळा करण्याचा प्रयत्न केला. पण ऑक्टोपस काही कॅमेरा सोडायला तयार नव्हता. त्याने कॅमेर्यासाठी माणसाशी फाइट केली. जेसीची मैत्रीण पॅरीने पाण्याखालील हा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला. पाण्याखालील टग ऑफ वॉर म्हणून हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. क्लाउटने ‘जर्विस बे थ्रू माय आइज’ या तिच्या फेसबुक पेजवरदेखील ही क्लिप देखील शेअर केली आहे. साथीदाराला वाचवण्यासाठी सापासोबत भिडला सरडा; VIDEO च्या शेवटी घडलं असं काही, ज्याची कल्पनाही केली नसेल हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. कुणी याला अद्भुत म्हटलं आहे. तर एकाने गोप्रोसाठी कधी जाहिरात आली असेल तर हीच आहे, अशी मजेशीर कमेंटही केली आहे.
या व्हिडीओवरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.