मराठी बातम्या /बातम्या /Viral /या 3 ज्यूसने आतडे होतील स्वच्छ, आहारात करा समावेश

या 3 ज्यूसने आतडे होतील स्वच्छ, आहारात करा समावेश

हेल्थ

हेल्थ

पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवासाठी अन्न आवश्यक असते. अन्नाशिवाय कोणताही प्राणी आणि मनुष्य जगू नाही. अन्नाचं पचन लहान आतड्यात होतं आणि त्यातून आवश्यक पोषक तत्त्वं शरीरात शोषली जातात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवासाठी अन्न आवश्यक असते. अन्नाशिवाय कोणताही प्राणी आणि मनुष्य जगू नाही. अन्नाचं पचन लहान आतड्यात होतं आणि त्यातून आवश्यक पोषक तत्त्वं शरीरात शोषली जातात. काही वेळा पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे खूप त्रास होतो. पोट जड झाल्यास मन अस्वस्थ होतं. त्यामुळे जोपर्यंत पोट पूर्णपणे साफ होत नाही, तोपर्यंत खूप त्रास होतो. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास ही समस्या आणखी वाढते. काही नैसर्गिक ज्यूसचं सेवन केल्यास आतड्यातली सर्व घाण स्वच्छ करता येते.

  फायबर्समुळे बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. फायबर्स हिरव्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात असतात. यासोबतच अनेक फळांमध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असते. इथे सांगितलेल्या तीन प्रकारच्या ज्यूसपैकी कोणताही एक ज्यूस दोन-तीन वेळा सेवन केल्यास पोट एका दिवसात साफ होऊ शकतं. अर्थात हे घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं उत्तम.

  हेही वाचा - ही 5 फळं संपवतील हाय कोलेस्टेरॉलची समस्या! हृदयही कायम राहील निरोगी

  1. सफरचंदाचं ज्यूस

  हेल्थलाइनच्या माहितीनुसार, पोट अनेक दिवस साफ होत नसेल तर सफरचंदाच्या ज्यूसचं सेवन करू शकता. सफरचंदाचा ज्यूस आतड्यांच्या डिटॉक्ससाठी खूप उपयुक्त आहे हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. सफरचंदाचं ज्यूस प्यायल्यानंतर पोट लवकर साफ होतं.

  2. व्हेजिटेबल ज्यूस

  व्हेजिटेबल ज्यूस पोट साफ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. फ्लॉवर, ब्रोकोली, पालक, टोमॅटो, गाजर, कोबी, दुधी भोपळा, कारलं इत्यादी भाज्यांचं ज्यूस तयार करावं आणि ते प्यावं. तसं केल्यास पोट लवकर साफ होतं आणि पोटाला आराम मिळतो.

  3. लिंबाचा ज्यूस

  पोट साफ करण्यासाठी तुम्ही कधीही लिंबाचा रस घेऊ शकता. लिंबाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे अॅसिडिटीही दूर होते. लिंबाचा रस पोटात लपलेले हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतो आणि पोटाला आराम देतो.

  हे लक्षात घ्या...

  सफरचंदाचा ज्यूस बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की त्याची साल काढू नका. सालीसह त्याचा ज्यूस तयार करा. कारण सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. व्हेजिटेबल ज्यूस रिकाम्या पोटी प्यायल्याने पोट लवकर साफ होतं. लेमन ज्यूस तुम्ही थोडं कोमट पिऊ शकता. यामुळे पोट लवकर साफ होण्यास मदत होते.

  First published:

  Tags: Health, Health Tips, Lifestyle, Stomach