मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ही 5 फळं संपवतील हाय कोलेस्टेरॉलची समस्या! हृदयही कायम राहील निरोगी

ही 5 फळं संपवतील हाय कोलेस्टेरॉलची समस्या! हृदयही कायम राहील निरोगी

उच्च कोलेस्ट्रॉलची मर्यादा ओलांडली तर ते हृदयविकाराचे कारण बनू शकते. ही घातक स्थिती टाळण्यासाठी, लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

उच्च कोलेस्ट्रॉलची मर्यादा ओलांडली तर ते हृदयविकाराचे कारण बनू शकते. ही घातक स्थिती टाळण्यासाठी, लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

उच्च कोलेस्ट्रॉलची मर्यादा ओलांडली तर ते हृदयविकाराचे कारण बनू शकते. ही घातक स्थिती टाळण्यासाठी, लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 फेब्रुवारी : सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी लोकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत. त्यामुळे लहान वयातच लोक आजारांना बळी पडत आहेत. यापैकी एक म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या, जी आजकाल झपाट्याने वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहेत. जर उच्च कोलेस्ट्रॉलची मर्यादा ओलांडली तर ते हृदयविकाराचे कारण बनू शकते. ही घातक स्थिती टाळण्यासाठी, लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

औषधांशिवायही तुम्ही सहज कोलेस्टेरॉल नियंत्रित करू शकता, असे तुम्हाला सांगण्यात आले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे बर्‍याच अंशी खरे असले तरी. एचटीच्या अहवालानुसार, काही फळे अशी आहेत, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ही फळे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. फळांमध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील पोषणाची कमतरता भरून काढतात आणि शरीराला मजबूत करण्याचे काम करतात. प्रत्येकाने आपल्या आहारात अशा फळांचा समावेश केला पाहिजे.

ही 5 फळे कोलेस्टेरॉलपासून आराम देईल

सफरचंद : सफरचंद हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर फळ मानले जाते. यामध्ये असलेले विद्राव्य फायबर हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच पॉलिफेनॉल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. रोज एक किंवा दोन सफरचंद खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कमी वेळात नियंत्रित राहते.

केळी : केळीमध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असते, जे उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते. केळी आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

द्राक्षे : द्राक्षांचा घड पाहून बहुतेकांच्या तोंडाला पाणी येते. द्राक्षे आपल्या रक्तप्रवाहातील खराब कोलेस्टेरॉल यकृतात घेऊन जातात, जिथे त्यावर प्रक्रिया केली जाते आणि उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते.

अननस : अननसात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात. यामध्ये असलेले ब्रोमेलेन रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करते आणि रक्त प्रवाह सुधारते. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि उच्च कोलेस्टेरॉलपासून आराम मिळतो.

अ‍ॅव्होकाडो : अ‍ॅव्होकाडोमध्ये ओलेइक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते. सॅलड, सँडविच, टोस्ट किंवा स्मूदी बनवून तुम्ही अ‍ॅव्होकाडो खाऊ शकता. याशिवाय ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरीच्या सेवनानेही कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

First published:

Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle