मुंबई, 13 सप्टेंबर : मजा, मस्करी करणं ठिक आहे. पण ते अति झालं की मस्करीची कुस्करी होते, हे आपल्याला माहितीच आहे. असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात सलूनमध्ये एका तरुणासोबत मस्करी करण्यात आली पण जे दिसलं ते पाहून तरुण जागीच बेशुद्ध झाला.
सलूनमधील प्रँकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सलूनमधील बार्बर सलूनमध्ये दाढी करायला आलेल्या तरुणासोबत प्रँक करायला गेला. पण तो इतका महागात पडेल असं त्याला वाटलंही नव्हतं. प्रँकमुळे तरुण इतका घाबरला की तो जागीच बेशुद्ध झाला.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण दाढी करण्यासाठी सलूनमध्ये खुर्चीत बसला आहे. तो अगदी आरामात डोळे बंद करून बसला आहे.
हे वाचा - बॅट्समनने मारला असा शॉट, टीव्हीबाहेर आला बॉल; आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO
तरुणाचे डोळे बंद असल्याने बार्बर आधीच त्याच्या मानेवर आणि हनुवटीवर लाल रंगाचं लिक्विड टाकतो, जसं काय ते रक्तच असावं असं वाटतं. तरुणाला यावेळी बार्बरने पाणी शिंपडलं असावं असं वाटतं म्हणून तो तसाच पडून राहतो. त्यानंतर बार्बर त्याची दाढी करायला घेतो आणि लगेच तो त्याची हनुवटी धरून ओरडायला लागतो.
तेव्हा तो तरुणही घाबरत उठतो. तो स्वतःला आरशात पाहतो तर काय त्याच्या हनुवटीजवळून भळाभळा रक्त वाहत असतो. जे पाहून त्याला धक्काच बसतो. तो मोठमोठ्याने ओरडू लागतो. खुर्चीवरून धाडकन उठतो. तेव्हा बार्बर त्याला पकडून पुन्हा खुर्चीत बसवतो. खुर्चीत बसताच तरुण तिथंच बेशुद्ध होतो. बार्बर त्याला उटवण्याचा प्रयत्न करतो पण तो काही उठत नाही.
हे वाचा - VIDEO : स्केटबोर्डवर स्टंट करताना गेला तोल अन्..., पाहा तरुणासोबत काय घडलं
jatt._.landd इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झाले आहेत. या तरुणाचं पुढे नेमकं काय झालं असेल अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos