मराठी बातम्या /बातम्या /Viral /भयंकर चक्रीवादळातही ही महिला प्रामाणिकपणे करीत होती स्वत:चं काम, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

भयंकर चक्रीवादळातही ही महिला प्रामाणिकपणे करीत होती स्वत:चं काम, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केले जात आहे. यामध्ये हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केले जात आहे. यामध्ये हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केले जात आहे. यामध्ये हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, 17 मे: देशातील अनेक राज्यात लोकांना तौत्के चक्रिवादळाचा सामना करावा लागत आहे. या वर्षातील हे पहिले वादळ आहे जे अरबी समुद्रात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे पुढील 12 तास हे अधिक धोक्याचे ठरणार आहे. सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केले जात आहे. यामध्ये हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं आणि बीएमसीशी विनंती करीत सांगितलं की, सर्व सफाई कर्मचाऱ्यांजवळ रेनकोट आहे की नाही याची एकदा चाचपणी करून घ्यावी. सोशल मीडियावर हा व्हिडिओ @Aladdin_ka_ या ट्विटर युजरने सोमवारी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, त्यांना सन्मान द्या, अशा परिस्थितीत मला हा अनुभव येतोय की, मी किती भाग्यशाली आहे.

हे ही वाचा-खवळलेव्या समुद्रात अडकले 273 कर्मचारी, INS Kochi निघाली वाचवण्यासाठी, Video

इंटरनेटच्या जगात हा विषय आता चर्चेचा विषय ठरला आहे. हेच कारण आहे की, लोक हा व्हिडिओ पसंत करीत आहेत. आनंद महिंद्रा हा व्हिडिओ पाहून इतके प्रभावित झालेत की, त्यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. आजच्या परिस्थितीत हे अत्यंत प्रेरणादायी आहे, आणि मला हे माहीत आहे की, @mybmc यांना रेनकोट उपलब्ध करून देतात. मात्र तरीही त्यांनी पुन्हा एकदा याची खात्री करून घ्यावी.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहू शकता की, एक महिला पावसात रस्त्यावर कचरा काढत आहे. यादरम्यान महिलेने डोकं पॉलिथिनने कव्हर केलं आहे. डोकं भिजण्यापासून वाचविण्यासाठी तिने हा जुगाड केला आहे. तिच्या आजू-बाजूने गाड्या जात आहेत. महिला मात्र भिजत असताना आपलं काम करीत आहे. महिला कसलाही विचार न करता अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करीत आहे.

Ms

First published:

Tags: Anand mahindra, Live video, Video viral