मुंबई, 17 मे : तौक्ते वादळ (Cyclone Tauktae) मुंबईजवळून गुजरातकडे वेगाने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाच्या संकटातून मुंबई थोडक्यात बचावली आहे. पण मुंबईसह उपनगरात पावसाने धुमशान घातले आहे. अरबी समुद्रात असलेल्या बॅाम्बे हायमध्ये बार्ज कंपनीचे 273 कर्मचारी अडकल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या समुद्रात इंधन आणि नैसर्गिक वायू गोळा करण्याचं काम करणाऱ्या बॅाम्बे हायमध्ये कर्मचारी अडकल्याची वृत्त हाती लागले आहे. बार्ज कंपनीचे एकूण 273 कर्मचारी अडकले आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कर्मचारी अडकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कर्मचारी अडकल्याची माहिती मिळताच नौदलाने रेस्क्यु ॲापरेशन सुरू केले आहे. INS Kochi आणि INS Talwar बॉम्बे हायकडे रवाना झाल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.
#CycloneTauktae मुंबईच्या समुद्रात बॅाम्बे हायवर अडकले २७३ कर्मचारी, सुटकेसाठी नौदलाकडून बचावकार्य सुरू #mumbairain pic.twitter.com/3lkHtuRNQf
— News18Lokmat (@News18lokmat) May 17, 2021
(वाचा-राज्यातील हवामान बदलाचा अंदाज देणारे 3 रडार नादुरुस्त, धक्कादायक माहिती समोर)
रायगडमध्ये 2 महिलांचा मृत्यू
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळचा (Cyclone Tauktae) रायगडला (Raigad) मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरं आणि झाडांची पडझड झाली आहे. आज सकाळी भिंत कोसळून एका भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी असलेल्या दुसऱ्या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला.
(वाचा-Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा तडाखा, उघड्यावर पडला संसार, घर झाले जमीनदोस्त)
आज सकाळी उरणमध्ये भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर भिंत कोसळली. यात नीता नाईक यांचा मृत्यू झाला होता. तर सुनंदा घरत या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.