लेडी सिंघम! चौदाव्या वर्षी बालविवाह..नंतर दोन मुलांची आई, जिद्दीच्या जोरावर आता थेट IPS!

लेडी सिंघम! चौदाव्या वर्षी बालविवाह..नंतर दोन मुलांची आई, जिद्दीच्या जोरावर आता थेट IPS!

मनात जिद्द असेल तर माणूस अगदी काहीही करून दाखवू शकतो. या महिलेनं घेतलेली भरारी हेच सांगते आहे.

  • Share this:

चेन्नई, 23 जानेवारी : एखाद्या माणसानं ठरवलं तर तो कुठल्याही परिस्थितीत झळाळतं यश मिळवू शकतो. या पोलीस अधिकारी महिलेचा प्रवास आपल्याला हीच गोष्ट अगदी ठळकपणे सांगतो. एन अंबिका हिचं लग्न (marriage) झालं तेव्हा ती होती केवळ 14 वर्षांची. तिचं लग्न एका पोलीसदलात काम करणाऱ्या व्यक्तीशी (policeman) झालं. अंबिका 18 वर्षांची होईपर्यंत 2 मुलांची (kids) आई (mother) झाली. तिचा संसार आणि सांसारिक जबाबदाऱ्या यात ती गुंतलेली असायची.

एकदा पतीसोबत (husband) ती प्रजासत्ताक दिनाची परेड (republic day parade) पाहण्यासाठी गेली. तो भव्य सोहळा पाहून ती भारावून गेली. तिथं तिनं पोलीस अधिकाऱ्याला मिळणारा सन्मानही डोळ्यांनी पाहिला. तिनं विचार केला, की आपण हा सन्मान मिळवला पाहिजे. तिनं मनाशी काहीएक निश्चय केला. याबाबत ती पतीशी बोलली तेव्हा ते म्हणाले, की हा सन्मान मिळणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी कठोर मेहनत करण्याची गरज असते.

हे ही वाचा-वडिलांच्या मृत्यूमुळे हार्दिक पंड्या पूर्णपणे खचला अजूनही सावरता येत नाहीये

सगळी प्रक्रिया अंबिकानं पतीकडून समाजावून घेतली. आणि आपण सिव्हिल सर्विसेसची परीक्षा पास व्हायचीच अशी प्रतिज्ञा केली. आता अंबिकासमोर आधी दहावी पूर्ण करण्याचं आव्हान होतं. तिनं अभ्यास करून दहावी पूर्ण केली. त्यानंतर बारावी आणि पदवी व पदव्युत्तर शिक्षण केलं. अंबिका एका अगदी लहानशा खेड्यात (village) राहायची. तिथं शिक्षणाच्या सोईसुविधा अजिबातच नव्हत्या. मग नवऱ्यानं पत्नीच्या राहण्यासह शिकण्याचीही व्हावस्था चेन्नईमध्ये (Chennai) केली. पती मुलांना सांभाळत नोकरी करू लागला. चेन्नईत अंबिका जिद्दीनं मेहनत करू लागली. मात्र तीन वेळा तिला अपयश आलं. पतीनं तिला परतण्याचा मार्ग सुचवला तेव्हा ती एक शेवटचा प्रयत्न करण्याबाबत बोलली. शेवटचा चौथा प्रयत्न तिनं पूर्ण ताकदीनिशी केला तेव्हा तिला यश आलं. 2008 च्या आयपीएस (IPS) लिस्टमध्ये तिचं नाव आलं. तिची पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात झाली. 2019 मध्ये तिला डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस या पदावर नियुक्त करण्यात आलं. अंबिकाला पोलीस दलात 'लेडी सिंघम' म्हणून ओळखलं जातं.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 10:47 PM IST

ताज्या बातम्या