वडिलांच्या मृत्यूमुळे हार्दिक पांड्या पूर्णपणे खचला, अजूनही सावरता येत नाहीये; भावनिक VIDEO केला शेअर

वडिलांच्या मृत्यूमुळे हार्दिक पांड्या पूर्णपणे खचला, अजूनही सावरता येत नाहीये; भावनिक VIDEO केला शेअर

शनिवारी सकाळी हार्दिक पंड्याने (Hardik pandya) वडिलांसोबत (Father) घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा एक भावनिक व्हिडिओ (Emotional video) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांचे वडील हिमांशु पांड्या (Himanshu pandya) यांचं निधन (Death) झालं आहे. वडिलांच्या अचानक अशा जाण्याने पांड्या भावंडांना जबरदस्त धक्का बसला आहे. पांड्या भावंडं अजून त्या दुःखातून सावरलेले नाहीत. शनिवारी सकाळी हार्दिक पंड्याने वडिलांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा एक भावनिक व्हिडीओ (Emotional video) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचे हिमांशु पांड्या यांनी वडोदरा येथे अखेरचा श्वास घेतला, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. वडिलांच्या निधनानंतर कृणाल पांड्या बडोदा संघाच्या बायो बबलमधून बाहेर पडला. थेट घरी पोहचला होता. हार्दिक आणि कृणाल पांड्या यांना क्रिकेटपटू बनवण्यात त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता. आपल्या मुलांना क्रिकेटर बनण्यासाठी चांगल्या सोयी सुविधा मिळावी म्हणून त्यांनी दुसऱ्या शहरात स्थलांतर केलं होतं. त्यासाठी त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला होता.

हिमांशु पांड्या हे सुरत येथे कार फायनान्सचा छोटासा व्यवसाय करायचे. मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी तो व्यवसाय बंद पाडला आणि वडोदराला स्थलांतर केलं. यावेळी हार्दिक केवळ पाच वर्षांचा होता. तिथे त्यांनी आपल्या मुलांना उत्तम क्रिकेट सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांनी दोघांना किरण मोरे अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश घेवून दिला. आर्थिकदृष्ट्या चणचण असणारं पंड्या कुटुंब सुरुवातीच्या काळात भाड्याच्या घरात राहत होते.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 9:30 PM IST

ताज्या बातम्या