नवी दिल्ली 08 एप्रिल : आजच्या काळात पैसा (Money) कमावणं फारसं अवघड नाही. पैसे कमावण्यासाठी तुमच्याकडे फक्त चांगले कौशल्य (Skills) असणं आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून लोक वेगवेगळ्या पद्धती वापरून पैसे कमवू लागले आहेत. पण इतर लोकांना कमाईच्या या पद्धती फारशा आवडत नाहीत आणि ते मोठ्या प्रमाणात ट्रोल (Troll) होऊ लागतात. सध्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडत आहे. ही महिला पैसे कमावण्यासाठी तिच्या पायांचे (Legs) फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या कमाईची ही पद्धत काही लोकांना खूप आवडते तर काही लोक तिच्यावर टीकेची झोड उठवतात. या महिलेला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.
कपलने FB वर शेअर केला अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचा फोटो; नेटकऱ्यांना दिसलं भीतीदायक दृश्य
`डेली स्टार` या वेबसाईटच्या वृत्तानुसार, टिकटॉक यूजर Cat Mama सोशल मीडियावर नेहमीच भरपूर चर्चेत असते. कारण चाहत्यांना तिचे सुंदर पाय पाहायला खूप आवडतात. कॅट मामा स्वतःच्या पायाच्या माध्यमातून मोठी कमाई (Earning) करते. ती केवळ `टिकटॉक`वर (TikTok) तिच्या पायांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते. आकर्षक पायांविषयी अनेकांमध्ये विशेष क्रेझ असते. असे लोक `कॅट मामा`ला फक्त तिचे पाय पाहण्यासाठी खूप पैसे देतात.
एका दिवसांत कमवते 60 हजार रुपये
रिपोर्टनुसार, ही महिला या माध्यमातून केवळ एका दिवसात 60 हजार रुपयांपर्यंत कमवते. कधीकधी तिला एका दिवसात यापेक्षाही जास्त पैसे मिळतात. ही महिला वेगवेगळ्या प्रकारचे नेलपॉलिश डिझाईन्स, नेल डिझाईन्स काढलेले तसेच दागिने, पैंजण घातलेले तिच्या पायाचे फोटो आणि व्हिडिओ `टिकटॉक`वर पोस्ट करते. याशिवाय ती पाय अधिक सुंदर आणि मुलायम कसे दिसतील, याविषयीच्या टिप्सही (Tips) चाहत्यांसोबत शेअर करते. कोको बटर लावल्याने पायाची त्वचा अधिक मुलायम होते, असंदेखील तिनं एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
15 वर्षांपासून महिलेच्या पाठीमध्ये अडकलेली बंदुकीची गोळी; अखेर दीड दशकानंतर झाला त्या घटनेचा खुलासा
सोशल मीडियावर युजर्स करतात ट्रोल
या महिलेचे अनेक चाहते आहेत. मात्र जेव्हा ती अशा विचित्र मार्गाने पैसे कमवते तेव्हा अनेक लोक तिच्यावर रागदेखील व्यक्त करतात. या महिलेला अनेकदा लोकांचे टोमणे (Retort) ऐकावे लागतात. या महिलेची लांब नखं पाहून काही लोक कीळस आल्याचं सांगतात. तर काही लोक स्त्रीला लांब नखांचा काय फायदा होतो, अशी विचारणा करून आश्चर्य व्यक्त करतात. अनेक जण पैसे देऊन या महिलेकडं तिच्या पायांचे फोटोही मागतात. या फोटोंसाठी ती लोकांच्या मागणीनुसार पायांचा मेकअप करते. एकूणच या महिलेचे सुंदर आणि आकर्षक पाय तिच्या कमाईचं साधन ठरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media troll, Viral news