मुंबई, 6 मार्च : हे जग अनेक अजब, आश्चर्यजनक गोष्टींनी भरलेलं आहे. अशीच एक गोष्ट म्हणजे अनेक अचाट, अफाट गोष्टी करणारी माणसं. एकदम आत्मविश्वासानं घोड्यावर बसलेली, घोडा पळवणारी माणसं तुम्ही पाहिली असतील. मात्र कधी कुठल्या माणसाला तुम्ही थेट खांद्यांवर घोड्याला उचलून घेतलेलं पाहिलं आहे का? (Instagram viral photo)
तर जगात असा एक माणूस आहे, जो घोड्याला थेट आपल्या खांद्यावर घेऊन पळतो. याशिवाय तो उंटासह अजून कितीतरी जनावरांना आपल्या खांद्यावर उचलू शकतो. पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही. फोटोत तुम्ही पाहू शकता, या माणसानं चक्क एका बैलाला आपल्या खांद्यांवर उचललं आहे. (Instagram viral video)
View this post on Instagram
हा माणूस युक्रेनचा राहणारा आहे. त्याचं नाव आहे दिमित्री खलादजी. हा माणूस जगातील सर्वात ताकदवान व्यक्तींपैकी एक आहे. (man lifting horse video)
View this post on Instagram
हा माणूस इतका ताकदवान आहे, की एकदाच 6 लोकांनाही उचलू शकतो. दिमित्रीचं इन्स्टाग्राम पेज पाहिलं तर, तो कशी अनोखी कामं करू शकतो, ते पाहता येईल. त्याचे हात इतके मजबूत आहेत, की तो चक्क केवळ हाताचा वापर करून खिळा ठोकतो. (man lifts horse Instagram)
(वाचा - ‘हा तर वेड्यांचा बाजार...’; फेरे घेताना नाचणाऱ्या नवरीला पाहून नेटकरी संतापले)
दिमित्री आधी सर्कशीत काम करायचा. तो दातांनी लोखंडाचा रॉड मोडू शकतो. प्रवाशांनी खचाखच भरलेली एसयूव्ही गाडी त्याच्यावरून जाते. त्याला काहीच होत नाही. तो आरामात पडून राहतो. (Dmitri lifts horse Insta video)
(वाचा - VIDEO : ना गाडी, ना घोडा चक्क उंटावर बीडमधील नवरदेवाची वरात; काय आहे कारण?)
या व्हिडीओत, त्याच्या पायांवर पियानो ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक मुलगी बसलेली आहे.
View this post on Instagram
तो आपल्या हातांनी तब्बल 152 किलोचं वजन उचलतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण दिमित्रीचं नाव एक किंवा दोनदा नाही, तर तब्बल 60 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, International, Social media viral, Viral photo, Viral video.