मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : ना गाडी, ना घोडा चक्क उंटावर बीडमधील नवरदेवाची वरात; कारण वाचून तुम्हीही पडाल चाट

VIDEO : ना गाडी, ना घोडा चक्क उंटावर बीडमधील नवरदेवाची वरात; कारण वाचून तुम्हीही पडाल चाट

12000 रुपये खर्च करुन या नवरदेवाने वरातीसाठी उंट मागवला होता.

12000 रुपये खर्च करुन या नवरदेवाने वरातीसाठी उंट मागवला होता.

12000 रुपये खर्च करुन या नवरदेवाने वरातीसाठी उंट मागवला होता.

बीड, 5 मार्च : आजपर्यंत आपण घोड्यावर, गाडीवर, एखाद्या बग्गीत नवरदेवाची काढलेली वरात पाहिली असेल. मात्र कोरोनामुळे काय परिस्थिती उद्भवू शकेल याबाबत काही तर्क लावता येत नाही. असाच एक प्रकार बीडमधून समोर आला आहे. बीडमधील या आगळ्या वेगळ्या वरातीची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी आणि एकमेकांना संसर्ग होऊ नये, यासाठी बीडच्या एका पत्रकार नवरदेवाने चक्क उंटावरून आपली वरात काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (Groom from Beed came on the camel in his own wedding)

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या साळेगाव येथील माजी सैनिक महादेव वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडीची कन्या ऐश्वर्या हिच्याशी संपन्न झाला. नवरदेव म्हटला की त्याच्याभोवती सर्वजण गोळा होतात. वरातीच्या वेळेसही नवरदेवाला नाचविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता या बीडमधील नवरदेवाने नवी शक्कल लढवली व त्याने चक्क उंटावरुन वरात काढायचा निर्णय घेतला. त्यामुळे हा नवरा घोड्यावर न बसता थेट उंटावर जाऊन बसला. यामुळे गावातून व तालुक्यातून उंटावरून वरात निघालेले पत्रकार अक्षय वरपे यांची मोठी चर्चा सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या उंटावर स्वार झालेल्या नवरदेवाकडे उपस्थित कुतूहलाने पाहात होते. दरम्यान याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

हे ही वाचा-मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम; अनोखा विवाह सोहळा पाहून धनंजय मुंडेही भारावले

अक्षय आणि त्याचे वडील यांनी लग्नात राज्य सरकारच्या कोरोना नियमांनुसार एकूण वरातींची संख्या 50 हून कमी ठेवली होती. सोबतच अक्षयने वरातीत घोड्याऐवजी उंटाला पाचारण केलं. त्याचं म्हणणं आहे की, उंचावर असल्या कारणाने कोरोना संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात राहिल. उंटासाठीच नवरदेवाने तब्बल 12 हजार रुपयांचा खर्च केला आहे.

First published:
top videos

    Tags: Beed news, Corona spread, Marriage