पुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर मात्र गाठलं पोलीस स्टेशन

पुरुषांवरील रागातून मैत्रिणीसोबत घेतली सप्तपदी; त्यानंतर मात्र गाठलं पोलीस स्टेशन

हा प्रकार समोर आल्यानंतर गावात मोठी चर्चा सुरू आहे.

  • Share this:

कानपुर, 28 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील कानपुर (Kanpur) जिल्हायात दोन मुलींनीच एकमेकांसोबत लग्न (Marriage) केलं आणि लग्नानंतर पोलीस ठाण्यात पोहोचल्या. मात्र येथे त्यांचं कोणी ऐकूनचं घेतलं नाही उलट रिकाम्या हातानेच त्यांना  परतावं लागलं. जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात समलैंगिकता वैध ठरविण्यात आली आहे, तेव्हापासून अशा लग्नांचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलं आहे.

कानपुरच्या एका गावात दोन मैत्रिणींनी एक वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर घरातून पळून लग्न केलं. यानंतर मात्र घरात गोंधळ झाला. मुलीने घेतलेल्या या निर्णयामुळे कुटुंबीय खूपच वैतागले. यानंतर एका तरुणीच्या आईने दुसऱ्या तरुणीवर व तिच्या भावावर मुलीचं अपहरण केल्याचा आरोप लावत पोलिसांकडे तक्रारच केली.

ही घटना कानपुरमधील गुंजन विहार येथील आहे. येथे एकाच परिसरात राहणाऱ्या रती तिवारी व नंदिनी गौतम यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघींनी एकमेकींशी लग्न केलं. मात्र कुटुंबीयांना आणि समाजाला हे मान्य नव्हतं.

हे ही वाचा-कोरोनाग्रस्त नवरी, रुग्णच झाले वऱ्हाडी; कोव्हिड वॉर्डमधील 'निकाह'चा VIDEO VIRAL

कुटुंबीय आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही, हे दोघींनी माहीत होतं. त्यामुळे दोघींनी घरातून पळून जाऊन लग्नाचा घाट घातला. यादरम्यान नंदिनीची आई गुडिया देवींनी पोलीस ठाण्यात रती आणि तिच्या भावावर आपल्या मुलीचं अपहरण केल्याचा आरोप लावला. तर नवरी झालेल्या नंदिनी गौतमचं म्हणणं आहे की, तिने रती तिवारीसोबत आपल्या इच्छेने लग्न केलं आहे. आईने रतीवर खोटे आरोप लावले आहेत. यासोबतचं लग्नसंबंधाबाबत नंदिनीने सांगितले की तिला पुरुषांवर   अत्यंत राग आहे. त्यामुळे तिने मुलाशी लग्न न करता आपल्या मैत्रिणीशी लग्न केलं. हा प्रकार समोर आल्यानंतर गावात मोठी चर्चा सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 28, 2020, 9:38 PM IST

ताज्या बातम्या