मुंबई, 14 डिसेंबर: वाहनचोरीसंदर्भात सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. चोर अगदी शिताफीने वाहनं चोरतात. परंतु, इतर वाहनांच्या तुलनेत लक्झरी कार्सची चोरी करणं फारच अवघड काम मानलं जातं. कारण अशा गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बरीच फीचर्स दिलेली असतात. असं असतानाही इंग्लंडच्या एक्सेस काउंटी या भागात चोरट्यांनी चक्क साठ सेकंदांमध्ये सात कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पाच लक्झरी कार्स पळवल्या आहेत. चोरटे इतक्या वेगाने हालचाली करत आहेत, की सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कार चोरीचा प्रकार चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. यात चोरटे अगदी हायटेक पद्धतीने चोरी करताना किंवा दरोडा टाकताना दाखवलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कारचोरीचा हा व्हिडिओ पाहिला, तर तो कुठल्या चित्रपटातला सीन आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ शकते. परंतु, ही खरी घटना असून चोरट्यांनी केवळ साठ सेकंदांमध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या कार पळवल्या आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेली. याचा व्हिडिओ पाहून पोलीसही चकित झाले आहेत. व्हिडिओत चार चोरटे कार घेऊन पळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांना आतापर्यंत याबाबतच्या तपासात काहीही यश मिळालेलं नाही. हेही वाचा: थांब तूझं नाकच कापतो म्हणत पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर पोर्शे, मर्सिडीज मेबॅकसह पाच कार पळवल्या चोरीच्या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ इंग्लंडमधल्या एक्सेस काउंटीमधला आहे. अंधारामध्ये चोरटे बुफलान गावातल्या ब्रेंटवूड रोडवर असलेल्या एका कॅम्पसमध्ये घुसतात आणि दोन पोर्शेकार, एक मर्सिडीज मेबॅकसह एकूण पाच कार कॅम्पसमधून पळवतात. कॅम्पसमध्ये घुसलेल्या चोरट्यांपैकी एक चोरटा आधी गेट उघडतो. इतर चोरटे कार सुरू करून पळवण्यासाठी तयार असतात. बाहेरच्या चोरट्याकडून इशारा मिळताच एकामागून एक सर्व गाड्या कॅम्पसच्या बाहेर जाताना या व्हिडिओत दिसत आहेत. परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना टिपली गेली. चोरट्यांनी केवळ 60 सेकंदांत पळवलेल्या पाचही कार्सची किंमत सात कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. चोरटे हाती लागेनात; पोलिसांना हवी लोकांची मदत- पाच लक्झरी कार्स पळवणाऱ्या चोरट्यांना शोधताना पोलिसांची दमछाक होत आहे. बराच तपास करूनही चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी आता नागरिकांकडून मदत मागितली आहे. पोलिसांनी स्वतःच या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करून याबाबत काही सुगावा लागला तर पोलिसांना कळवण्याबाबत आवाहन केलं आहे. एक्सेस पोलिस सध्या कार आणि चोरट्यांचा शोध घेत आहेत. पाच कार्सपैकी पोलिसांना मर्सिडीज मेबॅक कार शोधण्यात यश मिळालं असलं, तरी अन्य चार कार्सचा शोध त्यांना घेता आलेला नाही.
We are currently investigating an incident where multiple luxury cars were stolen from a unit on Brentwood Road in #Bulphan on 11 November.
— Essex Police (@EssexPoliceUK) December 5, 2022
Did you witness anything suspicious? If so, please contact us. pic.twitter.com/2huktS0PJI
गेटचा बोल्ट कापून कॅम्पसमध्ये घुसले लक्झरी कारचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्या वेगात ही चोरी झाली आहे, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अवघ्या काही सेकंदांमध्ये चोरटे कॅम्पसमध्ये घुसून पाच कार्स कसे काय पळवू शकतात, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चोरट्यांनी हा प्रकार अगदी शिताफीने केल्याचं दिसतं. दरोडेखोरीच्या संदर्भामध्ये तपास करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेत चार चोरट्यांचा समावेश आहे. सुरुवातीला चोरट्यांनी गेटचा बोल्ट कापला आणि त्यानंतर गेट उघडून कारचोरीचा केली आहे.