जाहिरात
मराठी बातम्या / Viral / फक्त 50 सेकंदात चोराचा असा कारनामा; व्हायरल होतोय हा VIDEO

फक्त 50 सेकंदात चोराचा असा कारनामा; व्हायरल होतोय हा VIDEO

चोरीचा व्हिडीओ

चोरीचा व्हिडीओ

एका व्यक्तीने चोराचा हा प्रताप आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 मे : चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असतात. चोर किती हुशारीने चोरी करतात हे बऱ्याच व्हिडीओत तुम्ही पाहिले असतील. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अवघ्या 50 सेकंदात चोराने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाल आहे. फक्त 50 सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे. एका बिल्डिंगमध्ये एक चोर चोरी करायला गेला. चार मजली ही इमारत बिल्डिंगच्या पाइपवरून तो बिल्डिंगवर चढला. समोरच्या बिल्डिंगमधील व्यक्तीने त्याला पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात शूट केलं. ज्यात त्याचा हा प्रताप कैद झालं.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका बिल्डिंगच्या पाइपवर एक व्यक्ती चढताना दिसते आहे. ती त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन बसते. तेव्हा ही व्यक्ती बघते आणि मोठ्याने ओरडते. कोण आहेस, काय करायला आला आहे, असं विचारते. तसा तो तरुण घाबरतो आणि बिल्डिंगवरून पुन्हा खाली उतरतो. त्याला सूट करणारी व्यक्ती त्याला पकडा पकडा असं ओरडतेही. खाली उतरल्यानंतर ही व्यक्ती फरार झाली. स्कूटी चोरायला आले अन् भयंकर घडलं, स्वतःचीच गाडी सोडून पळाले चोर; पाहा VIDEO @gharkekalesh ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील ही घटना आहे.

जाहिरात

50 सेकंदात हा चोर बिल्डिंगवर चढला आणि उतरला. असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चोरी झाल्यास भरपाई या व्हिडीओत हा चोर चोरी करण्यात अपयशी ठरला. पण प्रत्येकवेळी चोर सापडतीलच असे नाही. कुणाच्या घरात चोरी होऊ शकते. पण यानंतरही तुम्हाला भरपाई मिळू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या घराचा विमा काढला पाहिजे. ज्या प्रकारे आपण आपल्या वाहनाचा किंवा स्वतःचा विमा काढतो, त्याच प्रकारे घराचाही विमा उतरवला जातो. यामुळे तुम्हाला घराचे नुकसान भरून काढण्यास मदत मिळते. एक चांगला होम इन्शुरन्स नैसर्गिक आपत्तींपासून ते इतर प्रकारच्या नुकसानीला कव्हर करू शकतो. तुम्हाला विमा कंपनीकडून या प्रकारच्या इन्शुरन्सवर आर्थिक सहाय्य दिले जाते. या प्रकारचा इन्शुरन्स कोणीही घेऊ शकतो. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नियमित प्रीमियम भरावा लागेल. Video Viral : तरुणांनी मिळून दुकानदाराला असं फसवलं, पाहून नेटकरीही करु लागले कौतुक ज्यावेळी तुम्ही तुमच्या घराचा इन्शुरन्स काढता, तेव्हा ते तुमचे घर तसेच गॅरेज, हॉल, परिसर इ. कव्हर करते. यामध्ये तुम्हाला फर्निचर आणि इतर उत्पादने देखील अॅड ऑन सुविधेअंतर्गत मिळू शकतात. होम इन्शुरन्स तुम्हाला नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून तुमचे घर सुरक्षित करण्याचा ऑप्शन देते. याशिवाय तुमच्या घरात चोरी झाली असेल तर त्याचे नुकसानही कव्हर केले जाते. त्याच वेळी, काही विमा पॉलिसींमध्ये घरातून चोरीला गेलेल्या वस्तूंचे कव्हर देखील केले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात