ब्राझिलिया, 27 जुलै : आजवर चोरी ची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. चोरीचे व्हायरल व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण सध्या चोरीचं एक अजब प्रकरण चर्चेत आलं आहे. एक चोर एका तरुणीचा मोबाईल चोरायला आला पण त्याने त्याने तिच्या हृदयावरही डल्ला मारला. मोबाईल चोरायला आलेल्या चोराने तरुणीचं हार्टही चोरलं आहे. ब्राझीलमधील ही चोरीची अजब घटना आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने एका तरुणीचा मोबाईल फोन चोरला. त्यानंतर त्याने तिचं हृदयही चोरलं. आता हृदय चोरलं म्हणजे खरोखर त्या व्यक्तीने हार्ट चोरलं असं नाही तर तो तिच्या प्रेमात पडला. आश्चर्य म्हणजे ती तरुणीही आपला मोबाईल चोरणाऱ्या चोराच्या प्रेमात पडली.
चोरीने बनवलेल्या या जोडीचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात या कपलने आपल्या अजब प्रेमाची गजब कहाणी सांगितली आहे. कपलने सांगितलं की, महिला रस्त्याने जात होती, तेव्हा चोरट्याने तिचा फोन पळवला. चोराने मोबाईलमध्ये तिचा फोटो पाहिला. त्या सुंदर तरुणीला पाहून तो तिच्या प्रेमातच पडला. त्याला तिचा मोबाईल चोरल्याचा पश्चाताप झाला. आईच्या गावात…! बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी खतरनाक जुगाड; ATM मध्ये पैशांऐवजी टाकलं असं काही की… चोर म्हणाला की, “माझ्या आयुष्यात कुणी महिला नव्हती त्यामुळे मी कठीण परिस्थितीतून जात होतो. हिचा फोटो तिच्या फोनवर पाहिला आणि तिचा सुंदर चेहरा पाहिल्यावर मोबाईल चोरल्याचा पश्चाताप झाला.” या कपलची मुलाखत घेणाऱ्याने त्यांना तुम्ही तिचा फोन चोरला आणि मग तिचं हृदय असं विचारलं. यावर चोराने हो असं उत्तर दिलं. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार पोस्टनुसार, हे दोघंही 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण तरुणीचे पालक चोराचा आपल्या मुलीचा जोडदार म्हणून स्वीकार करतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही . बँक, दुकान नव्हे तर बाथरूममध्ये दरोडा; बंदुकीच्या धाकावर चोरांनी असं काही लुटलं की विश्वासच बसणार नाही; Watch Video या विचित्र लव्हस्टोरीवर अनेक कमेंट येत आहेत. काहींना ही प्रेमकथा आकर्षक वाटली तर काहींनी यांची खिल्ली उडवली आहे. तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.