मुंबई,20 मे : तोंडावर मास्क घालून लुटण्यासाठी येणं ही फार जुनी गोष्टी झालं. पण कुणी फळाच्या अवरणात स्वत:चं तोंड लपवून चोरी करायला आलं तर? अमेरिकेतील व्हर्जिनिया इथे हे प्रत्यक्षात घडलं आहे. दोन जण डोक्यावर कलिंगडाचं कवच घालून चोरी करण्यासाठी घुसले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या कलिंगडानं या दोन्ही चोरांचा चेहरा झाकला होता. फक्त डोळे दिसत होते. चोरची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्यांचे फोटो आणि माहिती अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केली, जिथे या फोटोंना बरेच लाईक्स कमेंट आणि शेअरही करण्यात आले आहेत. कलिंडगडाचं अवरण घालून का आले चोर, काय आहे प्रकरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मे रोजी रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी दोन चोर काळ्या रंगाच्या टोयोटो गाडीच्या मदतीनं चोरी करण्यासाठी दुकानात शिरले होते. त्यांनी मास्क ऐवजी कलिंगडाचं आवरण तोंडावर घातलं होतं. हे चोर कोण आहेत यांची माहिती कुणाला मिळाली तर पोलिसांसोबत संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं. एक अहवाला नुसार पोलिसांनी या चोरांना पकडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या फेसबुक पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कोरोनामुळे सर्वजण मास्क घातल असल्यानं चोरांनी अजब शक्कल लढवल्याचं युझर्सनी म्हटलं आहे.
‘द टाउन ऑफ लुइसा इथे पोलीस विभागाकडून मोठा तपास सुरू आहे. आम्ही एक फोटो अपलोड केला आहे. हा फोटो ओळखण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे’ पोलिसांनी फोटोसह ही पोस्ट अपलोड केल्यानंतर जवळपास 5 हजारहून अधिक शेअर आणि एक हजारहून अधिक लाईक्स या पोस्टला मिळाले आहेत. हे वाचा- ऋषी कपूर यांच्या आठवणीत पुन्हा भावुक झाल्या नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या… हे वाचा- बाबो! दारूनंतर खर्रा आणि तंबाखूसाठी एवढी मोठी रांग, महिला आघाडीवर संपादन- क्रांती कानेटकर