जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चोरांचा नादच खुळा! चालवता येत नाही, पण तरीही चोरली मारुती व्हॅन आणि मग...

चोरांचा नादच खुळा! चालवता येत नाही, पण तरीही चोरली मारुती व्हॅन आणि मग...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कोणत्याही वाहन चोरीच्या प्रकरणात, वाहन चोरल्यावर चोर ते स्वतः चालवत नेतो; पण कानपूरमध्ये कार चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 मे : कार किंवा अन्य वाहन चोरीच्या घटनांविषयी आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. पोलीस तपासानंतर आरोपींना अटक होते; मात्र काही वेळा आरोपींनी चोरी कशा पद्धतीनं केली हे जेव्हा पोलीस चौकशीतून समोर येतं, तेव्हा पोलिसांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. उत्तर प्रदेशातल्या कार चोरीचं प्रकरण असंच काहीसं आहे. सध्या विचित्र कार चोरी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणातल्या तीन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातले तीनपैकी दोन आरोपी उच्चशिक्षित आहेत. हे अजब कार चोरी प्रकरण नेमकं कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया. ट्रकचे काही टायर हवेत का लटकलेले असतात? यामागचं कारण असं की त्याचा आपण विचार देखील केला नसावा कोणत्याही वाहन चोरीच्या प्रकरणात, वाहन चोरल्यावर चोर ते स्वतः चालवत नेतो; पण कानपूरमध्ये कार चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. तीन चोर मारुती व्हॅन चोरी करण्यासाठी निघाले. त्यांनी वाहनचोरी केली; पण या तिघांनाही ती चालवता येत नव्हती. यावर या चोरांनी अजब शक्कल लढवली. त्यांनी मारुती व्हॅन चोरून ती 10 किलोमीटरपर्यंत धक्का मारत नेल्याचं स्पष्ट झालं आहे. कानपूरमधल्या नजीराबाद पोलिसांनी या तिन्ही आरोपींना मंगळवारी (23 मे) अटक केली आहे. त्यानंतर आरोपींची चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांकडून चोरीच्या दोन मोटारसायकल्सही जप्त करण्यात आल्या आहेत. मारुती व्हॅन चोरी प्रकरणात सत्यन कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा या तिघांना अटक करण्यात आली आहे. सत्यम हा महाराजपूरमधल्या एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये बीटेक करत आहे. अमन हा डीबीएस कॉलेजमध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. अमित एका बिल्डिंगमध्ये काम करतो. या चोरीचं सर्व प्लॅनिंग अमितने तयार केलं होतं. यात त्यांचं आणखी एक नियोजनही होतं. चोरी केलेली वाहनं विकण्यासाठी सत्यम एक वेबसाइट तयार करत होता. चोरी केलेल्या गाड्या विकल्या गेल्या नाहीत, तर त्या वेबसाइटच्या माध्यमातून विकण्याचं सत्यमचं प्लॅनिंग होतं. कितीही उंचावरुन मांजर पडली तरी तिला काहीच कसं होत नाही? यामागे लपलीय एक अजब ट्रीक 7 मे रोजी दबौली परिसरातून या तीन तरुणांनी एक मारुती व्हॅन चोरली होती, अशी माहिती एसीपी भेज नारायण सिंह यांनी दिली. एसीपी सिंह यांनी सांगितलं, की `या तीन तरुणांनी वाहनचोरी केली; पण त्यांच्यापैकी कोणालाही व्हॅन चालवता येत नव्हती. त्यासाठी त्यांनी दबौलीपासून 10 किलोमीटर अंतरापर्यंत धक्का मारत व्हॅन कल्याणपूरला आणली. तिथे त्यांनी व्हॅनची नंबरप्लेट काढली आणि एका पार्टीकडे ती लपवून ठेवली. व्हॅन कशी चालवायची हे कोणालाच माहिती नव्हतं, तरीही त्यांनी चोरी केली. ती व्हॅन भंगारात विकण्याचा या तिघांचा विचार होता.`

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात