मुंबई, 24 मे : पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षनामुळे कोणतीही गोष्ट वरुन फेकली तरी ती खाली पडते. तसेच जेव्हा एखादी गोष्ट उंचावरून वेगाने खाली पडते तेव्हा, तीक्ष्ण दुखापत होण्याची शक्यता वाढते. पण विचार करा की एखादी वस्तू, प्राणी किंवा व्यक्ती 20 व्या मजल्यावरून खाली पडली तर काय होईल? वस्तूचा तर चुरा हाऊन जाईल, शिवाय व्यक्ती किंवा प्राण्याच्या हड्या मोडून तो जिवंतच राहाणार नाही. पण असं असलं तरी देखील, जेव्हा मांजर अतिशय उंच इमारतीवरून खाली पडते किंवा उडी मारते तेव्हा तिला काहीच कसं होत नाही. तसेच काही वेळेला तिला थोडीफार दुखापत होऊन ती पुन्हा काही दिवसांनी आपल्या पायावर धावू लागते. पण मांजरी सोबत असं का होतं? तिला उंचावर उडी मारुन काहीच कसं होतं नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला यामागचं कारण जाणून घेऊ. जगातील अशी ठिकाणं जिथे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण काम करत नाही, भारतातही आहे असं ठिकाण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, उंचीवरून पडल्यानंतरही मांजरांना काही होत नाही, यामागे त्याच्या शारीरिक स्वरूपाची मोठी भूमिका आहे. मांजर हे जमिनीवर आणि झाडांवर राहणारे वन्यजीव आहेत. झाडावर राहिल्यामुळे मांजरांना नेहमी खाली पडण्याची भीती असते. या कारणामुळे कालांतराने, त्याने आपले शरीर अशा प्रकारे लवचिक बनवले आहे की, ते पडताच त्वरित प्रतिक्रिया देता. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा एखादी वस्तू खाली पडते, तेव्हा जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी तिच्या शेवटच्या गतीला टर्मिनल वेग म्हणतात. एक प्रकारे, हा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा आणि हवेच्या वरच्या जोराचा परिणाम आहे. 1987 मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, मांजरींच्या खाली पडण्याचा टर्मिनल वेग इतर प्राणी आणि मानवांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे मांजरीला फारसं काही होत नाही.
अभ्यासात असे आढळून आले की, खाली पडताना मांजर आपले चार पाय पसरते आणि पोट वर उचलते. त्यामुळे तिचे पोट पॅराशूटप्रमाणे काम करू लागते आणि खाली पडण्याचा वेग कमी होतो. खाली जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी, मांजर शेपूट वर उचलते, जेणेकरून तिचे पाय आधी जमिनीला स्पर्श करतात आणि पोट, तोंड यासह आवश्यक अवयवांना इजा होण्यापासून वाचवले जाते. या युक्तीमुळे, मांजर सहसा कोणत्याही उंचीवरून पडूनही सुरक्षितपणे जगते. मांजरींवरील अभ्यास अहवालानुसार, न्यूयॉर्कच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाने उंच इमारतींवरून खाली पडलेल्या 132 मांजरींचा शोध घेतला. यापैकी 90% मांजरांना मृत्यूपासून वाचवण्यात यश आले हे आश्चर्यकारक आहे. पण या मांजरींना त्या घटनेच्या वेळी किरकोळ उपचांराची गरज असल्याचं देखील समोर आलं आहे. एक मांजर 32 व्या मजल्यावरुन पडली होती, तेव्हा तिचा एक दात तुटला होता आणि फुफुसाला थोडा त्रास झाला होता. पण दोनच दिवसात तिच्यावर उपचार करुन तिला सोडण्यात आलं.