• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तरुणीने नशेत केलं लग्न, 4 दिवसांनंतर नवरीचा खुलासा ऐकताना पतीने घेतला मोठा निर्णय

तरुणीने नशेत केलं लग्न, 4 दिवसांनंतर नवरीचा खुलासा ऐकताना पतीने घेतला मोठा निर्णय

लग्न करण्यामागील कारणं ऐकून पतीला जबर धक्काच बसला.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 17 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior Love-Affair) हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. एक तरुणीने लग्नानंतर आपल्या पतीला सांगितलं की, ती दुसऱ्या तरुणावर प्रेम करते. तिचं दुसऱ्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. नवीन नवरीचं ऐकून पतीने त्याला विचारलं की, जर तिचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे तर त्याने त्या तरुणासोबत लग्न का नाही केलं? यावर नवरी म्हणाली, (Bride Love Affair) की ती नशेत होती. नशेच्या अवस्थेत तिने लग्न केलं होतं. यावर पतीने पत्नीच्या आनंदासाठी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. फॅमिली कोर्टाने (Family Court) तरुणाच्या अर्जाचा स्वीकार केला आहे. सांगितलं जात आहे की, त्याने जेव्हा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला तेव्हा कोरोना महासाथीमुळे कोर्ट बंद होते. यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी (Talaq Application) वेळ लागला. सांगितलं जात आहे की, लग्नाच्या चौथ्या दिवशी तरुणीने सांगितलं की, तिचं दुसऱ्या तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. ती लग्नापूर्वी 6 महिन्यांपर्यंत लिव्ह इनमध्ये राहत होती. बराच विचार केल्यानंतर त्याने पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पतीला सांगितलं की, दुसऱ्या तरुणावर करते प्रेम.. जेव्हा पतीला कळालं की, पत्नी दुसऱ्या तरुणावर प्रेम करते. त्यावेळी त्याने लग्न करण्यामागील कारण विचारलं. तिच्या कुटुंबीयांनी इतक्या धुमधडाक्यात लग्न काय लावलं. यानंतर पत्नी रडू लागली. तिने सांगितलं की, लग्नाच्या वेळी मी नशेत होते. दोघांनी यावर बरीच चर्चा केली. पत्नीने सांगितलं की, ती या लग्नाला मानत नव्हती. ती दुसऱ्या तरुणावर प्रेम करते. ज्यानंतर पत्नीच्या आनंदासाठी तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. तरुणाने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. कोरोनामुळे अर्ज स्वीकारण्यास वेळ लागला होता. मात्र आता हा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. हे ही वाचा-या महिलेच्या सौंदर्यावर भलेभले फिदा; चेहरा पाहून नाही येणार वयाचा अंदाज तरुणाने फॅमिली कोर्टात सांगितलं की, पत्नी लखनऊमध्ये आपल्या प्रियकरासह काम करीत होती. ती 6 महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. यानंतर दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं होतं. कोर्टाने या प्रकरणात विचार करीत तरुणाच्या अर्जाचा स्वीकार केला आहे. लग्नाच्या चार दिवसांनंतर नवरी आपल्या माहेरी परतली होती.
  Published by:Meenal Gangurde
  First published: