नवी दिल्ली, 23 जुलै : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र हे व्हिडीओ कितपत खरे असतात किंवा नाही याबाबत मात्र शंका असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ खरा असला तरी, त्याचे स्थान मात्र खोटे असल्याचे समोर आले आहे.
सध्या सोशल मीडियावर अमृतसरच्या रतन सिंह चौकातील असल्याचा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये चक्क हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यात टक्कर झाल्याचे दिसत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरचे पंख फिरत असताना, अचानक मागून एक ट्रक येतो, आणि त्यांची टक्कर होते. हा व्हायरल व्हिडीओ खरा असला तरी तो अमृतसर किंवा भारतातला नाही आहे, तर ब्राझीलमधला आहे.
वाचा-VIDEO: हत्तीच्या सोंडेवर बसून महिलेचं सुरू होतं Photo shoot आणि...
हा व्हिडीओ सध्या वॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर यांच्यावर तुफान व्हायरल होत आहे. 22 जुलै रोजी एका युझरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याला लाखो व्ह्युज आले. त्यानंतर इतर लोकंही हा व्हिडीओ व्हायरल करू लागले.
*It's Happen Only in India ...*
Amritsar Ratan Singh Chowk.. Accident of Helicopter & Truck
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿 pic.twitter.com/XNs72d3jdV
— Bank Nifty :3rd to 7th August Unexpected level (@BrainandMoney) July 22, 2020
वाचा-VIDEO: बिल्डिंगला आग लागली म्हणून चिमुरड्याने 40 फूटांवरून मारली उडी आणि...
मात्र फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ ब्राझीलचा असल्याचे समोर आले. जानेवारी 2020मध्ये ब्राझीलच्या रियो ब्रांको परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या हेलिकॉप्टरचा आणि ट्रकचा अपघात झाला होता.या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात घडला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये 5 लोकं होते.
वाचा-4 वर्षांच्या लेकीला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांशी भिडली आई, CCTVमध्ये दिसला थरार
सोशल मीडियावर अनेकदा फेक व्हिडीओ किंवा चुकीचा मजकूर असलेले व्हिडीओ व्हायरल केले जातात. त्यामुळे असे व्हिडीओ फॉरवर्ड करताना सावधान.
संपादन - प्रियांका गावडे